Ganesh Temple : एकाच मंदिरात गणपतीची तीन रुपं, श्रीरामांशी आहे संबंध?
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
गणेश चतुर्थी, तिल चतुर्थी आणि दर बुधवारी मंदिरात भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते. तर, चैत्र मासात प्रत्येक बुधवारी इथे जत्रा भरवली जाते.
शुभम मरमट, प्रतिनिधी
उज्जैन, 14 सप्टेंबर : आता केवळ काहीच दिवस, मग बाप्पा घरोघरी विराजमान होईल आणि भक्त उत्साहाने त्याचा पाहुणचार करतील. बाप्पाचं कोणतंही रूप मन प्रसन्न करतं. त्याचं प्रत्येक रूप साजिरं दिसतं. चिंतामण रूपात बाप्पा भक्तांच्या सर्व चिंता दूर करतो असं मानलं जातं, तर इच्छामन रूपात भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतो असं म्हटलं जातं. तसंच त्याच्या सिद्धिविनायक रुपामुळे भक्तांना सिद्धी प्राप्त होते, अशी मान्यता आहे.
advertisement
मध्यप्रदेशच्या उज्जैन भागातील प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिरापासून 6 किलोमीटर अंतरावर बाप्पाचं एक प्राचीन मंदिर आहे. चिंतामण गणेश नावाने या मंदिराची कीर्ती दूरदूरवर पसरली आहे. चिंतामण, इच्छामन आणि सिद्धिविनायक अशा तीनही रूपात या मंदिरात बाप्पा एकाच स्थानी विराजमान आहे. असं म्हणतात की, या मंदिराची स्थापना नवव्या ते तेराव्या शतकात झाली होती. मंदिराच्या शिखरावर सिहांचं रूप पाहायला मिळतं. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यकाळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला.
advertisement
हे मंदिर म्हणजे सीता देवीने स्थापित केलेल्या अष्टविनायकांपैकी एक आहे, असं मानलं जातं. श्रीराम, भगवान लक्ष्मण आणि सीतेने अवंतिका भागातील महाकाल वनात प्रवेश केला तेव्हा आपला प्रवास निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी विनायकांची स्थापना केली होती, अशी मान्यता आहे. लंकेहून परतताना राम, सीता आणि लक्ष्मण याठिकाणी थांबले होते, असंही म्हटलं जातं. इथून जवळच एक 80 फूट खोल विहीर आहे, जी लक्ष्मण यांच्या नावाने ओळखली जाते.
advertisement
मंदिराचे पुजारी पंडित राहुल गुरू सांगतात की, गणेश चतुर्थी, तिल चतुर्थी आणि दर बुधवारी मंदिरात भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते. तर, चैत्र मासात प्रत्येक बुधवारी इथे जत्रा भरवली जाते. बाप्पाच्या चरणी सांगितलेली एखादी इच्छा पूर्ण झाल्यास भाविक याठिकाणी पायी चालत येऊन दर्शन घेतात.
advertisement
दरम्यान, इच्छापूर्तीसाठी भाविक इथे इच्छेचा धागा बांधतात. उलटा स्वस्तिकदेखील काढतात. तसंच दूध, दही, तांदूळ, नारळ यापैकी कोणत्याही एका पदार्थाचा नैवेद्य बाप्पाला दाखवला जातो. परिसरातील भाविक प्रत्येक शुभकार्याच्या सुरुवातीला मंदिरात येऊन बाप्पाचं दर्शन घेतात.
Location :
Ujjain,Madhya Pradesh
First Published :
September 14, 2023 1:09 PM IST