अद्भुत आहे हे गणेश मंदिर, इथं गणपती देतो 'मानवरूपात' दर्शन; पूजाही अशी की इतर कोणत्याच मंदिरात होत नाही
- Published by:Priya Lad
Last Updated:
हे एकमेव असं गणेश मंदिरा आहे, जिथं गणपतीचं मानव रूप पाहायला मिळतं.
चेन्नई, 07 सप्टेंबर : देशभरात अनेक गणेश मंदिरं आहेत. सर्व मंदिरांचे स्वतःचं वेगळं वैशिष्ट्य आणि पौराणिक महत्त्व आहे. पण कोणत्याही मंदिरात गेलात तर तुम्हाला बाप्पा गजरुपातच पाहायला मिळतो, पण देशात एक असंही गणेश मंदिर आहे, जिथं गणपती चक्क मानवरूपात दर्शन देतो. या मंदिरात अशी एक खास पूजाही होते, जी इतर कोणत्याच मंदिरात होत नाही. हे मंदिर आहे तामिळनाडूमध्ये.
तामिळनाडूच्या तिरुवरूर जिल्ह्यातील कुटनूरपासून 3 किमी अंतरावर असलेलं तिलतर्पण जिथं आदिविनायक मंदिर आहे. या मंदिरात गणेशाची मूर्ती गजमुखी नाही तर नरमुखी आहे. म्हणजे इथं गणेशाची हत्तीच्या स्वरूपात नाही तर मानवाच्या स्वरूपात असलेल्या मूर्तीची पूजा केली जाते. इथल्या गणेशाच्या मूर्तीचा चेहरा हत्तीसारखा नाही तर माणसासारखा आहे. शिवाय देशातील हे एकमेव मंदिर आहे जिथं भाविक आपल्या पूर्वजांच्या शांतीसाठी पूजा करण्यासाठी येतात.
advertisement
पौराणिक कथांनुसार, भगवान श्रीरामांनी आपल्या पूर्वजांच्या शांतीसाठी या ठिकाणी पूजा केली होती. जेव्हा भगवान राम आपल्या वडिलांचं अंतिम संस्कार करत होते, तेव्हा त्यांनी ठेवलेल्या चार पिंडांचं किड्यांमध्ये रूपांतर झालं होतं. हे एकदा नाही तर जितक्या वेळा पिंड तयार केले तितक्या वेळा घडलं. यानंतर भगवान श्रीरामांनी भगवान शिवाची प्रार्थना केली. त्यानंतर भगवान शिवांनी त्यांना आदि विनायक मंदिरात येऊन विधीनुसार पूजा करण्यास सांगितलं. भगवान शिवांनी सांगितल्यानंतर श्रीराम इथं आलं आणि त्यांनी आपल्या वडिलांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी इथं पूजा केली. तांदळाच्या त्या चार पिंडांचं रूपांतर चार शिवलिंगात झालं असं म्हणतात. सध्या ही चार शिवलिंगं आदिविनायक मंदिराजवळ असलेल्या मुक्तेश्वर मंदिरात आजही आहेत.
advertisement
प्रभू रामाने सुरू केलेल्या या परंपरेमुळे आजही लोक आपल्या पूर्वजांच्या शांतीसाठी येथे पूजा करण्यासाठी येतात. त्यामुळेच या मंदिराला तिलतर्पणपुरी असंही म्हणतात. पितरांना प्रसन्न करण्यासाठी पूजा सहसा नदीच्या काठावर केली जात असली तरी मंदिराच्या आत धार्मिक विधी केले जातात. या आगळ्या-वेगळ्या गोष्टींसाठी येथे दूरदूरवरून लोक दर्शन आणि पूजेसाठी येतात.
advertisement

फोटो - विकीपीडिया
आदिविनायक मंदिरात केवळ श्री गणेशच नाही तर भोलेनाथजींचीही पूजा केली जाते. इथं गणेशासोबतच शिव आणि माता सरस्वती यांचंही मंदिर आहे. तसं या मंदिरात विशेषतः गणपतीची पूजा केली जाते. मात्र आदिविनायकासोबत येथे येणारे भाविक माता सरस्वती आणि भगवान शंकराच्या मंदिरात नक्कीच दर्शन घेतात.
Location :
Tamil Nadu
First Published :
September 07, 2023 7:48 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
अद्भुत आहे हे गणेश मंदिर, इथं गणपती देतो 'मानवरूपात' दर्शन; पूजाही अशी की इतर कोणत्याच मंदिरात होत नाही