Ram Mandir : आता आपल्या घरीच घेऊन जा राम मंदिर; कलाकाराने बनवली हुबेहूब प्रतिकृती

Last Updated:

कोल्हापूरच्या एका आर्टीस्टने राम भक्तांसाठी अगदी सेम टु सेम दिसणारी राम मंदिराची प्रतिकृती बनवली आहे.

+
News18

News18

साईप्रसाद महेंद्रकर / प्रतिनिधी
कोल्हापूर : राम मंदिर उद्घाटन सोहळ्याची उत्सुकता आता संपूर्ण जगभरात सर्वांना आहे. मात्र प्रत्येकाला सध्या तरी आयोध्येला जाऊन राम मंदिरात प्रभू श्रीरामांचे दर्शन घेणे शक्य नाही. त्यावर उपाय म्हणून कोल्हापूरच्या एका आर्टीस्टने आणला आहे. त्याने राम भक्तांसाठी अगदी सेम टु सेम दिसणारी राम मंदिराची प्रतिकृती बनवली आहे. ही प्रतिकृती इतकी हुबेहूब आहे की आपण प्रत्यक्षात मिनी राम मंदिर पाहिल्याचा भास होतो.
advertisement
कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातील रवी शिंदे या कलाकाराचा आर्ट क्राफ्ट अँड डिझाईन असा स्टुडिओ आहे. यामध्ये तो वेगवेगळ्या प्रतिकृती बनवत असतो. सध्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राम मंदिराच्या प्रतिकृतीची कल्पना त्याच्या डोक्यात आली. म्हणूनच ज्यांना मंदिराच्या दर्शनासाठी जाता येणार नाही अशा लोकांसाठी ही मंदिर प्रतिकृती बनवण्याचे रवी यांनी ठरवले. त्यांनी बनवलेल्या, हुबेहूब खऱ्या राम मंदिराप्रमाणे दिसणाऱ्या या प्रतिकृतीला आता विविध ठिकाणांहून मागणी देखील वाढली आहे, रवी शिंदे यांनी सांगितले आहे.
advertisement
कशी आहे ही प्रतिकृती
रवी यांनी बनवलेली ही राम मंदिराची सुरुवातीला त्यांनी फक्त पाच दिवसात बनवली होती. 7 फूट 2 इंच लांब, 3 फूट 4 इंच रुंद आणि 3 फूट 2 इंच उंच अशी ही राम मंदिर प्रतिकृती त्यांनी बनवली आहे. या प्रतिकृतीमध्ये त्यांनी जितके जास्त बारीक सारीक गोष्टी दाखवता येतील तितके त्यांनी यामध्ये प्रयत्न केले आहेत. मंदिराची प्रतीकृती बनवण्यासाठी त्यांनी 5 मिलीमीटर आणि 10 मिलीमीटरच्या फोमचा वापर केला आहे, अशी माहिती रवी यांनी दिली आहे.
advertisement
किती रुपये आहेत किंमती?
रवी यांच्याकडे वेगवेगळ्या आकाराच्या मंदिर प्रतिकृती उपलब्ध आहेत. त्यामध्ये 5 फूट लांबीपासून 7 फूट लांब देखील मंदिर प्रतिकृती आहेत. त्यांच्या किंमती या 30 हजार रुपयांपासून ते 1 लाख 10 हजार रुपयांपर्यंत आहेत. आकारमानानुसार या किंमती वाढत जातात, असे रवी यांनी सांगितले.
22 जानेवारीला जय श्रीराम म्हणा आणि खा पोटभर पाणीपुरी, दुकानदाराची अनोखी ऑफर
दरम्यान खऱ्याखुऱ्या राम मंदिराला दर्शनाला जेव्हा जाता येईल तेव्हा येईल, पण तोपर्यंत किमान या छोट्या मंदिराचे दर्शन घेऊन समाधान मानण्यासाठी  कित्येक जण ही राम मंदिर प्रतिकृती मागवून घेत आहेत.
मराठी बातम्या/अध्यात्म/
Ram Mandir : आता आपल्या घरीच घेऊन जा राम मंदिर; कलाकाराने बनवली हुबेहूब प्रतिकृती
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement