Ram Mandir : दिव्यांग मुलांनी साकारली राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती; तुम्हीही पाहून कराल कौतुक
- Published by:News18 Marathi
Last Updated:
दिव्यांग मुलांनी राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकार केली आहे. ते गेली दीड ते दोन महिने हे मंदिर बनवण्याच काम करत होते.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : दिव्यांग म्हंटल की त्यांच्याकडे एका वेगळ्या नजरेने पाहिले जाते. या मुलांना किंवा व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक सामाजिक उपक्रम हे नेहमीच वेगवेगळ्या स्तरावर राबवले जातात. पुण्यात दिव्यांग मुलांसाठी अब नॉर्मल होम संस्था गेली 12 वर्ष झालं काम करत आहे. दिव्यांग मुलांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना देखील त्या गोष्टी कळाल्या पाहिजे यासाठी नेहमी वेगवगेळे उपक्रम ही संस्था राबत असते. अब नॉर्मल या संस्थेत शिकणाऱ्या मुलांनी यावर्षी राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकार केली आहे. ते गेली दीड ते दोन महिने हे मंदिर बनवण्याच काम करत होते.
advertisement
दिव्यांग मुलांनी साकारली राम मंदिराची प्रतिकृती
अब नॉर्मल होम या शब्दातच वेगळे पण आहे. दिव्यांग मुलांचं हे केंद्र आहे. गांधी भवन कोथरूड या ठिकाणी 2012 पासून ही संस्था काम करत आहे. दिव्यांग मुलांचा विकास करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणं हाच उद्देश या संस्थेचा आहे. ही संस्था दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवतं असते. त्याचं थीम वर मुलांना वर्ष भर माहिती देखील दिली जाते. या आधी आर्मी, किल्ले, स्वातंत्र 75 ही थीम बनवून घेतलेली आहे. सध्या सगळीकडेच राम मंदिराची चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे.
advertisement
ज्ञानात भर टाकण हा उद्देश
या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांना त्या थीम विषयी माहिती सांगून त्यांच्या ज्ञानात भर टाकण हा उद्देश आहे. सामाजिक, आर्थिक, मानसिक, बौद्धिक, शारीरिक अशा पाच पैलू वर काम करत यामाध्यमातून त्यांना शिक्षण दिले जाते. साडे दहा फुटामध्ये हे मंदिर बांधलं गेलं आहे. यामधून त्या मुलांचा कॉन्फिडन्स वाढला आहे. दीड महिना या मंदिरासाठी काम केल गेलं आहे तसेच दिवसाचे 15 ते 16 तास देऊन शाळेत थांबून मुलांनी काम केलं आहे. या मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा हा या मागचा उद्देश आहे, अशी माहिती अब नॉर्मल होमच्या संचालिका किशोरी पाठक यांनी दिली आहे.
advertisement
श्रीराम हे माझे आदर्श, अयोध्येची केली वारी, मुस्लीम तरुणीची अनोखी रामभक्ती!
ही राम मंदिराची प्रतिकृती सारसबाग येथे पाहण्यासाठी सर्वांसाठी खुली आहे. या माध्यमातून रामाच दर्शन होईल आणि या विशेष मुलांन पर्यंत देखील पोहचता येईल.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
January 18, 2024 2:12 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Ram Mandir : दिव्यांग मुलांनी साकारली राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती; तुम्हीही पाहून कराल कौतुक