Ram Navami 2025: रामनवमीला घरी अशी करावी श्रीरामाची पूजा; पहा विधी, पूजा साहित्य, धार्मिक महत्त्व
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Ram Navami 2025: त्रेतायुगात याच दिवशी भगवान विष्णूंचा अवतार म्हणून राजा दशरथाच्या घरी रामाचा जन्म झाला. म्हणूनच चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमीला रामनवमी साजरी केली जाते. पंचांगानुसार..
मुंबई : हिंदू धर्मात रामनवमीला महत्त्वाचे स्थान आहे. असे मानले जाते की, त्रेतायुगात याच दिवशी भगवान विष्णूंचा अवतार म्हणून राजा दशरथाच्या घरी रामाचा जन्म झाला. म्हणूनच चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमीला रामनवमी साजरी केली जाते. पंचांगानुसार, यावर्षी रामनवमी 6 एप्रिलला आहे. या दिवशी भक्तिभावाने श्रीरामाची पूजा केल्याने घरात सुख-शांती नांदते आणि सर्व दुःख दूर होतात. या दिवशी भगवान श्री रामाची पूजा कशी करावी ते पाहूया. पूजेची पद्धत, शुभ मुहूर्त, नैवेद्य, मंत्र याबद्दल जाणून घेऊ.
पूजा-अर्चा कशी करावी : रामनवमीच्या दिवशी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते. स्नानानंतर, तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यात लाल फूल आणि काही तांदूळ घालून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावा. नंतर घरात स्वच्छ ठिकाणी रामाचा फोटो किंवा मूर्ती ठेवून पूजा करा. रामाच्या पूजेत पिवळ्या रंगाचे विशेष महत्त्व आहे. देवाला पिवळी फुले, पिवळे कपडे आणि चंदन अर्पण करा. यासह श्री रामचरितमानस किंवा सुंदरकांडचे पठण करा. पूजा करताना 'ओम श्रीं ह्रीं क्लीम रामचंद्राय श्री नमः' हा मंत्र 108 वेळा जप करा. यामुळे विशेष फलप्राप्ती होते. तसेच घराच्या छतावर रामध्वज फडकवणे शुभ मानले जाते.
advertisement
हवन केल्याने विशेष आशीर्वाद मिळतात: रामनवमीच्या दिवशी चैत्र नवरात्र समाप्त होते. हवन करणे अतिशय फलदायी मानले जाते. हवन करताना तूप, लाकूड, जव, गूळ यासारख्या हवन साहित्यांचा वापर करून मंत्रांसह नैवेद्य दाखवा. असे केल्याने प्रभु रामांचे आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहतील.
advertisement
रामनवमी पूजा साहित्य यादी: राम दरबाराचा फोटो, चंदन, अभिषेकासाठी दूध, कापूर, फूल-हार, सुंदरकांड किंवा रामायण ग्रंथ, सुपारी, लवंग, झेंडा, पिवळे कापड, दिवा तुळशीची पाने, दही, दूध पंचमेव मध पाच फळे, साखर गंगाजल, गाईचे तूप, तांदूळ इत्यादी.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 05, 2025 6:34 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Ram Navami 2025: रामनवमीला घरी अशी करावी श्रीरामाची पूजा; पहा विधी, पूजा साहित्य, धार्मिक महत्त्व