Parrot Vastu Tips: घरात पोपट पाळणं लकी? हे वास्तु नियम आधी जाणून घेणं महत्त्वाचं
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Parrot Vastu Tips: अनेकांच्या मनात प्रश्न असतो की, घरात पोपट ठेवणं शुभ की नाही? तो कोणत्या दिशेला ठेवावा? याबाबत ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्याकडून जाणून घेऊ.
मुंबई : पोपट हा सर्वांना आवडणारा पक्षी आहे. त्याचा आवाज घरात प्रसन्नता राखतो. अनेक पोपट माणसाप्रमाणं हुबेहुब बोलण्याची नक्कल करतात. वास्तु आणि ज्योतिषशास्त्रानुसार घरात पोपट पाळणं अत्यंत शुभ मानलं जातं. पोपट घरात असल्यानं सकारात्मक ऊर्जा घरात राहते. तुमच्या घरातील मुलांसाठीही तो खूप फायदेशीर आहे. पण अनेकांच्या मनात प्रश्न असतो की, घरात पोपट ठेवणं शुभ की नाही? तो कोणत्या दिशेला ठेवावा? याबाबत ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्याकडून जाणून घेऊ.
1.पोपटाचं महत्त्व - अनेकांना घरात पाळीव प्राणी-पक्षी पाळायला आवडतात. जेणेकरून घरात सकारात्मक ऊर्जा येईल, व समृद्धी राहील. वास्तू आणि धार्मिक मान्यतेनुसार पोपट हा अत्यंत शुभ पक्षी मानला जातो.
2. वास्तुशास्त्रात आहेत नियम - तुम्हाला माहीत आहे का, जसे वास्तुचे नियम इतर गोष्टींसाठी आहेत, त्याचप्रमाणे ते घरात प्राणी किंवा पक्षी पाळण्यासाठीही आहेत. चला तर, जाणून घेऊया घरात पोपट पाळणं शुभ की अशुभ? तो कोणत्या दिशेला ठेवावा?
advertisement
3. पोपट पाळणं शुभ अशुभ? वास्तुशास्त्रानुसार घरात पोपट पाळणं अत्यंत शुभ मानलं जातं. पोपट घरात असल्यानं सकारात्मकता येते, आनंदी वातावरण राहते. पोपट घरात ठेवल्यानं कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि आपुलकी राहते.
4. पोपट कोणत्या दिशेला ठेवावा? - वास्तुनुसार पोपट घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावा. त्यामुळे शुभ फळ मिळतं. त्याचबरोबर उत्तर दिशा ही बुध ग्रहाची दिशा मानली जाते, आणि पोपट बुधाचे प्रतीक असणारा पक्षी मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार पोपटाचा संबंध देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांच्याशी आहे. त्याच्या शुभ प्रभावानं तुमची संपत्ती वाढते. तुमची बुद्धीही तल्लख होते.
advertisement
5. पूर्व दिशेला पोपट ठेवावा का? - पूर्व दिशा ही सूर्यदेवाची दिशा मानली जाते, जी शक्ती आणि यशाचे प्रतीक आहे. वास्तुशास्त्रानुसार जर पोपट पूर्व दिशेला ठेवला, तर यामुळे घरात समृद्धी येते, व आनंद राहतो.
advertisement
6. कोणत्या दिशेला पोपट ठेवू नये? - वास्तुशास्त्रानुसार पोपट कधीही घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवू नये. कारण दक्षिण दिशा ही यमराजाची दिशा मानली जाते. यमाची दिशा म्हणजेच मृत्यूची दिशा असते. तर पश्चिम दिशा राहूची दिशा मानली जाते. या दिशेला पोपट ठेवल्यास अशांतता आणि समस्या निर्माण होतात.
7. पोपट पिंजऱ्यात ठेवावा का? - जर तुम्ही घरात पोपट पाळत असाल तर तुमचा पोपट आनंदी राहील, याची विशेष काळजी घ्या. कारण जर पोपट तुमच्या घरात आनंदी नसेल, तर त्याचा तुमच्या घरावर वाईट परिणाम होतो. इतकंच नाही, जर तुमच्या घरात रोज भांडण होत असेल तर त्याचाही पोपटावर वाईट परिणाम होतो. पोपट जे बघतो, जे ऐकतो तसाच तोही वागू लागतो.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 10, 2024 1:20 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Parrot Vastu Tips: घरात पोपट पाळणं लकी? हे वास्तु नियम आधी जाणून घेणं महत्त्वाचं








