Chandra Gochar 2024: 13 डिसेंबरपासून लकी काळ! चंद्राचे वृषभ राशीत गोचर; या तीन राशींना होणार फायदा
- Published by:Ramesh Patil
- trending desk
Last Updated:
Chandra Gochar 2024: अनेक जणांचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास असतो, रोजचं राशीभविष्य व ग्रहांच्या चालीबद्दल जाणून घेऊन ते त्यांची कामं करत असतात. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी राशी बदलत असतात. ज्याचे माणसाच्या जीवनावर शुभ आणि अशुभ परिणाम होतात. काही राशींसाठी येणारा काळ खूप चांगला ठरणार आहे.
advertisement
2024 मध्ये 16 नोव्हेंबर रोजी पहाटे 03:16 वाजता चंद्राने वृषभ राशीत गोचर केले होते. त्यानंतर आता तो 13 डिसेंबर 2024 ला दुपारी 1 वाजून 18 मिनटांनी पुन्हा वृषभ राशीत गोचर करेल. सध्या तो शनिदेवाची रास कुंभेमध्ये आहे. चंद्राच्या वृषभ राशीतील गोचरनंतर 13 डिसेंबरपासून कोणत्या राशीचे अच्छे दिन येतील, ते जाणून घेऊयात.
advertisement
advertisement
advertisement
कर्क - नोकरदारांचे पगार अजून झाले नसतील, तर त्यांना शुक्रवारपर्यंत चांगली बातमी मिळू शकते. वाहन खरेदीचा निर्णय या वेळी दुकानदारांसाठी चांगला राहील. रिलेशनशिपमध्ये असलेल्या लोकांचं नातं घट्ट होईल. पार्टनरबरोबर मोठ्या ट्रिपवर जाण्याचा प्लॅन ठरू शकता. 30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना सांधेदुखीपासून आराम मिळेल. ज्यांना नुकत्याच त्वचेशी संबंधित समस्या सुरू झाल्या आहेत, त्यांच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा होण्याची शक्यता आहे.
advertisement
वृश्चिक - वृश्चिक राशीच्या नोकरदारांचा नोकरीच्या ठिकाणी सन्मान वाढेल. तुमचा बॉस तुमच्या कामावर खूश असेल आणि तो तुमचं प्रमोशन करू शकतो. ग्राहकांची संख्या वाढेल, त्यामुळे व्यापाऱ्यांचे काम वाढेल. बिझनसमन या महिन्यात त्यांच्या नावावर दुसरे नवीन घर खरेदी करू शकतात. अविवाहितांची त्वचेशी संबंधित समस्यांपासून सुटका होईल. विवाहित जोडप्यांमधील प्रेम वाढेल. जे लोक नुकतेच रिलेशनशिपमध्ये आले आहेत ते त्यांच्या पार्टनरसोबत डेटवर जाऊ शकतात.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)







