टाळं लावताच शत्रू कमकुवत होतात; 'हे' मंदिर इच्छापूर्तीसाठी आहे प्रसिद्ध
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
विशेषतः भांडणांपासून, कोर्ट-कचेरीच्या कामांपासून मुक्ती मिळवण्यासाठी या देवीची प्रार्थना केली जाते.
रवी सिंह, प्रतिनिधी
विदिशा, 18 ऑगस्ट : आपली भारतभूमी विविध धार्मिक स्थळांनी सजलेली आहे. इथे अनेक प्राचीन मंदिरं आहेत. या प्रत्येक मंदिराला स्वतःची अशी एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. आपल्याला जे मिळालंय त्याबद्दल आभार मानण्यासाठी आणि काही इच्छा असल्यास त्याबद्दल मागणं मागण्यासाठी आपण देवापुढे नतमस्तक होतो. काहीजण वाईट शक्तींपासून आपलं संरक्षण व्हावं यासाठीदेखील देवाकडे प्रार्थना करतात.
advertisement
मध्यप्रदेशच्या विदिशा जिल्ह्यातही एक असं मंदिर आहे, जिथल्या देवीवर भाविकांची अपार श्रद्धा आहे. विशेष म्हणजे शत्रूचे आपल्याविरोधातील प्रयत्न हाणून पाडण्यासाठी इथे प्रार्थना केली जाते. बेतवा नदीकिनारी वसलेल्या या मंदिराला 'टाळेवाली माता मंदिर' या नावाने ओळखलं जातं. आपल्यापर्यंत येणाऱ्या सर्व नकारात्मक शक्ती रोखण्यासाठी इथे भाविक बेर फळाच्या झाडाला टाळं बांधून त्याची चावी देवीसमोर ठेवतात. विशेषतः भांडणांपासून, कोर्ट-कचेरीच्या कामांपासून मुक्ती मिळवण्यासाठी या देवीची प्रार्थना केली जाते.
advertisement
पुजारी नवल महाराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिर परिसरातील बेरच्या झाडाखाली जमिनीतून 30 वर्षांपूर्वी देवीची मूर्ती निघाली होती. या मूर्तीची मंदिरात स्थापना करण्यात आली. सुरुवातील भाविकांनी या झाडाला टाळं बांधून देवीची प्रार्थना केली असता, त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या. त्यामुळे देवीवरील श्रद्धा दृढ झाली. आता शनिवार, मंगळवार आणि गुरुवारी मंदिरात भाविकांची मांदियाळी असते. दूरदूरवरील भक्त इथे हजेरी लावतात. टाळेवाली देवी मंदिर परिसरातच माझी माता आणि कुल्लू मातेचंही मंदिर आहे.
advertisement
'भाविकांनी देवीच्या चरणात ठेवलेल्या चाव्या आम्ही गोळा करून एका ठिकाणी ठेवतो. आतापर्यंत अनेक चाव्या जमिनीत पुरल्या, तर अनेक चाव्या नदीच्या प्रवाहात सोडल्या', असं पुजाऱ्यांनी सांगितलं. दरम्यान, अशी मान्यता आहे की, इच्छेचं टाळं बांधल्यावर देवी भाविकांच्या नशिबाचं दार उघडते.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Vidisha,Madhya Pradesh
First Published :
August 18, 2023 10:56 AM IST