गोविंदा, यंदा दहीहंडीत तू पावसाने न्हाऊन निघणार! हवामान विभागाचा अंदाज
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
'हे' राज्य वगळता देशाच्या इतर भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. 1 ते 14 सप्टेंबर दरम्यान पावसाचा हा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मुंबई, 18 ऑगस्ट : राज्यात पावसाने सध्या उघडीप घेतली असली, तरी देशाच्या अनेक भागांमध्ये मात्र पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पावसाने नागरिकांना दिलासा दिला, तर काही ठिकाणी भीतीचं वातावरण निर्माण केलं.
आता हवामान विभागाने सप्टेंबर महिन्यातील पावसाचा अंदाज जारी केला आहे. हवामानशास्त्र पुणे विभागाचे प्रमुख डॉ. कृष्णानंद होसळीकर यांनी ट्विटरवरून दिलेल्या माहितीनुसार, पूर्व आणि ईशान्य भारतात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे. भारताच्या पूर्व भागात बिहार, झारखंड, ओडिसा, पश्चिम बंगाल आणि अंदमान निकोबार बेटाचा समावेश होतो. तर, अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड आणि त्रिपुरा हे राज्य भारताच्या ईशान्य भागात आहेत. हे राज्य वगळता देशाच्या इतर भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. 1 ते 14 सप्टेंबर दरम्यान पावसाचा हा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे गोविंदांनो...यंदा दहीहंडी खेळताना तुम्ही पावसाने न्हाऊन निघणार आहात.
advertisement
Rainfall forecast 1 Sept to 14 Sept:
Wk 3: Mostly rainfall is close to normal except in East and North East India where above normal rainfall is predicted
Wk 4: Mostly rainfall is close to normal in most of the country pic.twitter.com/kUJOm39KGH— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 17, 2023
advertisement
दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दिल्लीत 19 आणि 20 ऑगस्ट रोजी पाऊस पडल्यानंतर तापमान वाढण्याची शक्यता आहे. तर, छत्तीसगडमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून उष्णतेची लाट निर्माण झाली होती. मात्र इथेदेखील येत्या काही दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या दोन्ही राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा कहर सुरूच आहे. मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे येथील लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय.
advertisement
आपल्या महाराष्ट्राचा विचार केल्यास 18 ते 24 आणि 25 ते 31 ऑगस्टदरम्यान पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. प्रामुख्याने विदर्भाच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. शेजारच्या परिसरातदेखील पाऊस पडू शकतो. तर, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सरासरी पाऊस अपेक्षित आहे, मात्र स्पष्ट नाही, असं होसळीकर यांनी म्हटलं होतं.
Location :
First Published :
August 18, 2023 9:38 AM IST