Mahabharat : महाभारताशी जोडलेला आहे रक्षाबंधनचा 'धागा', कृष्णाने प्रत्येक धाग्याचं फेडलं होतं ऋण
- Published by:Priya Lad
Last Updated:
Mahabharat Story : रक्षाबंधनाचा सण कसा आणि केव्हा सुरू झाला याबद्दल इतिहासात कोणतेही स्पष्ट पुरावे नाहीत. पण भाऊ आणि बहिणीच्या स्नेहाशी संबंधित या रक्षाबंधनचा उल्लेख महाभारतातही आहे.
नवी दिल्ली : रक्षाबंधनाचा सण 9 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. भावाबहिणीचा हा सण. यामुळे त्यांच्यात एक वेळाच उत्साह, आनंद असतो. बहिणी आपल्या राखी बांधतात, त्याला ओवाळततात आणि त्याच्या आवडीची मिठाई बनवून त्याला खाऊ घालतात. तर या प्रसंगाला खास बनवण्यासाठी भावाचीही अनेक दिवस आधीच तयारी सुरू असते. भाऊ बहिणीला छानसं गिफ्ट देतो. पण याच रक्षाबंधनाच्या राखीचा धागा महाभारताशी जोडलेला आहे, याबाबत तुम्हाला माहिती आहे का?
रक्षाबंधनाचा सण कसा आणि केव्हा सुरू झाला याबद्दल इतिहासात कोणतेही स्पष्ट पुरावे नाहीत. पण भाऊ आणि बहिणीच्या स्नेहाशी संबंधित या रक्षाबंधनचा उल्लेख महाभारतातही आहे.
Mahabharat : द्रौपदीशिवाय युधिष्ठिरची आणखी एक पत्नी, महाभारतात तिचा उल्लेख फार का नाही? कोण होती ती?
महाभारतातील पहिली कथा
जेव्हा भगवान श्रीकृष्णाचं बोट सुदर्शन चक्राने कापलं तेव्हा रक्त वाहू लागलं. हे पाहून द्रौपदीने तिच्या साडीचा छोटासा भाग फाडला आणि तो तो त्याच्या बोटावर बांधला. त्यानंतर कृष्णाने वचन दिलं की तो प्रत्येक धाग्याचं ऋण फेडेल. असं म्हणतात की हा दिवस श्रावण महिन्यातील पौर्णिमेचा दिवसदेखील होता. नंतर जेव्हा कौरवांनी भरसभेत द्रौपदीचं वस्त्रहरण केलं तेव्हा श्रीकृष्णाने द्रौपदीची साडी आपल्या लीलेने इतकी लांब केली की कौरवांना पराभव स्वीकारावा लागला.
advertisement
महाभारतातील दुसरी कथा
तसं रक्षाबंधनाशी संबंधित आणखी एक उल्लेख महाभारतातच आढळतो. असं म्हटलं जातं की महाभारत युद्ध जिंकण्यात राखीने मोठी भूमिका बजावली. महाभारत युद्धादरम्यान युधिष्ठिरने भगवान श्रीकृष्णाला विचारलं की ते सर्व संकटांवर कसं मात करू शकतात. कृष्णाने त्यांना आणि त्यांच्या सैन्याला रक्षा धागा बांधण्यास सांगितलं. ही घटनाही श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी घडली असं सांगितलं जातं. तेव्हापासून या दिवशी पवित्र रक्षासूत्र बांधलं जातं.
advertisement
(सूचना : हा लेख सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. जो फक्त माहितीसाठी देण्यात आला आहे. न्यूज18मराठीने याची पुष्टी केलेली नाही. तसंच या दाव्याचं समर्थनही करत नाही.)
Location :
Delhi
First Published :
August 08, 2025 8:01 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Mahabharat : महाभारताशी जोडलेला आहे रक्षाबंधनचा 'धागा', कृष्णाने प्रत्येक धाग्याचं फेडलं होतं ऋण