Palmistry: तुमच्याही तळहातावर आहे का तीळ? नोकरी आणि पैशांच्या बाबतीत होतात अशा गोष्टी
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Palmistry: शुक्र पर्वतावर तीळ ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र पर्वतावर तीळ असणे शुभ मानले जात नाही. ज्यांच्या तळहातावर शुक्र पर्वतावर तीळ आहे त्यांना वैवाहिक जीवनात अडचणींचा सामना करावा लागतो.
मुंबई : ज्योतिषशास्त्रात हस्तरेषाशास्त्राला विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार तळहातातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेले तीळ वेगवेगळे परिणाम देतात. काही तीळ शुभ, तर काही अशुभ मानले जातात. तळहातावर असणारा तीळ पाहून कोणत्याही व्यक्तीचा स्वभाव जाणून घेता येऊ शकतो. आज आपण तिळाशी संबंधित काही खास चिन्हांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या पाहून एखाद्या व्यक्तीच्या आर्थिक स्थितीचा अंदाज लावला जाऊ शकतो.
शुक्र पर्वतावर तीळ ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र पर्वतावर तीळ असणे शुभ मानले जात नाही. ज्यांच्या तळहातावर शुक्र पर्वतावर तीळ आहे त्यांना वैवाहिक जीवनात अडचणींचा सामना करावा लागतो. जोडीदारासोबत छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होतात. यासोबतच तुम्हाला सरकारी बाबी आणि नोकरीमध्ये अडचणी येऊ शकतात. मधल्या बोटावर तीळ ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने मधल्या बोटावरील तीळ खूप शुभ मानले जाते. असे असणे म्हणजे तुम्ही खूप भाग्यवान आहात. मधल्या बोटावरील तीळ जीवनात कधीही सुख आणि संपत्तीची कमतरता आणत नाही.
advertisement
चंद्र पर्वतावर तीळ ज्यांच्या तळहातावर चंद्र पर्वतावर तिळाचे चिन्ह असते, त्यांचे मन अस्थिर आणि चंचल राहते. अशा लोकांना जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यासोबतच हे लोक प्रेमातही अपयशी ठरतात.
गुरु पर्वतावर तीळ हस्तरेषाशास्त्रानुसार ज्यांच्या तळहातावर गुरू पर्वतावर तीळ आहे, अशा लोकांना जीवनात भरपूर संपत्ती मिळते. अशा लोकांना जीवनात कधीही संपत्ती आणि ऐश्वर्याची कमतरता भासत नाही.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 23, 2025 12:54 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Palmistry: तुमच्याही तळहातावर आहे का तीळ? नोकरी आणि पैशांच्या बाबतीत होतात अशा गोष्टी