advertisement

उद्या रामनवमी! फक्त 51 मिनिटांचा सुवर्ण मुहूर्त, करू नका 'ही' चूक; अन्यथा होईल मोठं नुकसान

Last Updated:

26 मार्च 2026 रोजी देशभरात 'श्री रामनवमी' अत्यंत उत्साहात साजरी केली जाणार आहे. चैत्र नवरात्रीचा नववा दिवस आणि प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव हा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र दिवसांपैकी एक मानला जातो.

News18
News18
Ram Navami 2026 : उद्या, 26 मार्च 2026 रोजी देशभरात 'श्री रामनवमी' अत्यंत उत्साहात साजरी केली जाणार आहे. चैत्र नवरात्रीचा नववा दिवस आणि प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव हा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र दिवसांपैकी एक मानला जातो. यंदा पंचांगानुसार नवमी तिथी दोन दिवस असली, तरी प्रभू रामांचा जन्म 'मध्यान्ह' काळात झाला असल्याने 26 मार्च रोजीच मुख्य जन्मोत्सव साजरा करणे शास्त्रशुद्ध ठरेल. विशेष म्हणजे, यंदा पूजेसाठी एक अत्यंत मर्यादित पण प्रभावशाली 51 मिनिटांचा 'अति शुभ' काळ उपलब्ध आहे, ज्यामध्ये केलेली प्रार्थना थेट ईश्वरापर्यंत पोहोचते असे मानले जाते.
51 मिनिटांचा 'अति शुभ' मुहूर्त आणि वेळ
यंदा रामनवमीला अनेक शुभ योग जुळून येत आहेत. नवमी तिथी 26 मार्च रोजी सकाळी 11:48 ला सुरू होत असली, तरी रामलल्लाचा जन्म दुपारी 12:25 च्या सुमारास झाला होता. पूजेचा मध्यान्ह मुहूर्त दुपारी 11:13 ते 01:41 पर्यंत असेल. तर 51 मिनिटांचा सुवर्ण काळ दुपारी 12:00 ते 12:51 हा काळ 'अमृत' मुहूर्तासारखा असून याच 51 मिनिटांत राम जन्माचा सोहळा, पाळणा आणि आरती करणे सर्वाधिक फलदायी मानले गेले आहे. या 51 मिनिटांत 'राम रक्षा स्तोत्र' किंवा 'विष्णू सहस्रनामाचा' पाठ केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सुख-समृद्धीचा वास होतो.
advertisement
चुकूनही करू नका 'या' चुका; अन्यथा होईल नुकसान
रामनवमीच्या दिवशी काही गोष्टी कटाक्षाने टाळणे आवश्यक आहे, अन्यथा व्रताचे पूर्ण पुण्य मिळत नाही. राम जन्माचा सोहळा दुपारी 12:25 च्या सुमारास होतो. अनेकांना सवय असते की ते सोयीनुसार संध्याकाळी पूजा करतात, पण जन्मोत्सवाची मुख्य पूजा मध्यान्ह काळातच करणे अनिवार्य आहे. हा दिवस आनंदाचा आहे. घरात कोणाशीही भांडण, वादविवाद किंवा अपशब्द वापरू नका. मानसिक शांतता भंग पावल्यास पूजेचे फळ मिळत नाही. या दिवशी चुकूनही लसूण, कांदा किंवा मांसाहाराचे सेवन करू नका. केवळ सात्विक आहार किंवा फलाहार घ्यावा. प्रभू रामाला तुळस अत्यंत प्रिय आहे. मात्र, या दिवशी झाडावरून तुळशीची पाने तोडू नका.
advertisement
भाग्य बदलणारे 'हे' सोपे उपाय
तुमच्या जीवनातील संकटे दूर करण्यासाठी उद्याच्या मुहूर्तावर खालील गोष्टी नक्की करा.
रामरक्षेचा धागा: उद्या पूजेच्या वेळी पिवळ्या धाग्याला 11 गाठी मारून तो प्रभू रामांच्या चरणाशी ठेवा आणि नंतर तो आपल्या मनगटावर बांधा. यामुळे तुमचे सर्व संकटांपासून रक्षण होईल.
दानधर्म: रामनवमीला गरीब किंवा गरजू व्यक्तीला गुळ आणि चण्याची डाळ दान केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात.
advertisement
सुंठवडा प्रसाद: प्रभू रामांना सुंठवड्याचा नैवेद्य दाखवणे विसरू नका, कारण हा आरोग्यदायी प्रसाद राम जन्माचे मुख्य प्रतीक मानला जातो.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
उद्या रामनवमी! फक्त 51 मिनिटांचा सुवर्ण मुहूर्त, करू नका 'ही' चूक; अन्यथा होईल मोठं नुकसान
Next Article
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement