advertisement

Ramayana : शूर्पणखाशिवाय आणखी एक स्त्री जी प्रभू श्रीरामांच्या प्रेमात पडली होती, लग्नही करायचं होतं

Last Updated:

Ramayan Story : रामायणात अशा अनेक स्त्रिया होत्या ज्यांना रामाशी लग्न करायचं होतं, त्या स्वतः त्यांच्याकडे लग्नाचे प्रस्ताव घेऊन येत असत. पण राम नकार देत असे. राम सीतेशी एकनिष्ठ राहिले.

प्रतीकात्मक फोटो (AI Generated)
प्रतीकात्मक फोटो (AI Generated)
नवी दिल्ली : रामायणातील शूर्पणखेची गोष्ट तर तुम्हाला माहितीच आहे. रावणाची बहीण जी प्रभू श्रीरामांना पाहताच क्षणी त्यांच्या प्रेमात पडली आणि त्यांना लग्नाची मागणी घातली. पण प्रभू श्रीरामांनी आपण सीतेशी विवाहित असल्याचं सांगत तिला नकार दिला. तेव्हा शूर्पणखेने सीतेवर हल्ला केला आणि मग लक्ष्मणाने रागावून शूर्पणखेचे नाक कापलं. पण शूर्पणखेशिवाय आणखी एक स्त्री आहे, जिला प्रभू श्रीरामांशी लग्न करायचं होतं.
रामायणात भगवान राम यांचा विवाह फक्त सीतेशी झाला होता. रामाला एका समर्पित पतीच्या रूपात दाखवण्यात आलं होतं ज्याने आपल्या पत्नीशिवाय इतर कोणाचाही विचार केला नाही. तथापि अयोध्या आणि इतर राज्यांतील अनेक सुंदर स्त्रिया त्याच्यावर मोहित झाल्या. काहींनी त्याच्यावर प्रेम व्यक्त केलं तर काहींनी त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली.
advertisement
देवदत्त पटनायक यांनी त्यांच्या नवीन पुस्तक "सती सावित्री"मध्ये अनेक स्त्रीवादी कथांचा उल्लेख केला आहे ज्या कधीही प्रकाशात आल्या नाहीत. यामध्ये त्यांनी रामाकडे आकर्षित होणाऱ्या महिलांबद्दल सांगितलं आहे. तसंच रामायणातील अरण्यकांडातही याचा उल्लेख आहे. त्यापैकी एक स्त्री आहे वेदवती.
कोण होती वेदवती?
वेदवती ही एक पौराणिक पात्र आहे, जिचा उल्लेख वाल्मिकी रामायणातील उत्तरकांडात आहे. ती एक तपस्वी होती, जी भगवान विष्णूची भक्त आणि अत्यंत सुंदर मानली जाते. वेदवती कुशध्वज ऋषींची कन्या होती. ती लहानपणापासूनच भगवान विष्णूची पूजा करत होती. तिचं ध्येय भगवान विष्णूला पती म्हणून प्राप्त करणं होतं. यासाठी तिने कठोर तपस्या केली.
advertisement
मग जेव्हा त्रेतायुगात विष्णूचा अवतार भगवान राम पृथ्वीवर आले तेव्हा वेदवतीने त्यांना पाहिलं. ती त्यांच्याकडे गेली. तिने त्यांच्याशी लग्न करण्याचा प्रस्ताव मांडला. वेदवतीने रामाला भगवान विष्णू म्हणून ओळखलं असा उल्लेख आहे. मग रामाने वेदवतीला सांगितलं की यावेळी तो फक्त सीतेचा पती आहे. म्हणून तो या जन्मात तिला स्वीकारू शकत नाही पण पुढच्या जन्मात ती निश्चितच त्याच्या आयुष्यात असेल.
advertisement
पुढच्या जन्मात राम कृष्णाच्या रूपात पृथ्वीवर आले आणि असं म्हटलं जातं की वेदवती त्यांना पुढच्या जन्मात रुक्मिणीच्या रूपात भेटली.
वेदवतीने रावणाला दिला होता शाप
वेदवतीच्या कथेत एक महत्त्वाचा वळण येतो जेव्हा तिच्या सौंदर्याने मोहित झालेल्या लंकेचा राजा रावणाने तिचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला. त्याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वेदवतीने रावणाला शाप दिला की तो एका स्त्रीमुळे मरेल. यानंतर वेदवतीने तिच्या पवित्रतेचे रक्षण करण्यासाठी अग्नीत प्रवेश केला. तिने आपले प्राण सोडले.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Ramayana : शूर्पणखाशिवाय आणखी एक स्त्री जी प्रभू श्रीरामांच्या प्रेमात पडली होती, लग्नही करायचं होतं
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement