Shravan Somwar: जव की जवस? श्रावणातल्या चौथ्या सोमवारी शिवामूठ कोणती? पाहा महत्त्व
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Shravan Somwar: श्रावणातील प्रत्येक सोमवारी भगवान शिवशंकरांना शिवामूठ अर्पण करण्याची परंपरा आहे. चौथ्या सोमवारच्या शिवामूठबद्दल बऱ्याचदा संभ्रम असतो.
मुंबई: श्रावण महिना हा व्रत-वैकल्यांचा महिना म्हणून ओळखळा जातो. या काळात शिवाची आराधना केली जाते. प्रत्येक सोमवारी शिवपूजा केली जाते आणि यावेळी शिवलिंगावर शिवामूठ अर्पण केली जाते. यंदा श्रावण महिन्यात चार सोमवार असून 18 ऑगस्ट रोजी चौथा आणि शेवटचा सोमवार आहे. या दिवशीची पूजा आणि शिवामूठ कोणती अर्पण करावी, याबाबत मुंबईतील आदित्य जोशी गुरुजी यांच्याकडून जाणून घेऊ.
श्रावणातील प्रत्येक सोमवारी भगवान शिवशंकरांना शिवामूठ अर्पण करण्याची परंपरा आहे. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी जवस अर्पण केले जाते. अनेकांना संभ्रम असतो की ‘जव की जवस’ अर्पण करावे. परंतु धार्मिक परंपरेनुसार शिवामूठ म्हणून चौथ्या सोमवारी जवसच अर्पण करायचे आहे. यालाच आपण अळशी असं म्हणतो.
advertisement
शिवामूठ जवस अर्पण करण्याचे महत्त्व
view commentsश्रावण सोमवारी जवस अर्पण करण्याचे महत्त्व आहे. भगवान शिवशंकराच्या पिंडीवर प्रथम पांढरी फुले अर्पण करून दूध आणि पाण्याने अभिषेक करावा. त्यानंतर भक्तीभावाने जवसाची शिवामूठ वाहावी. शिवामूठ अर्पण करताना ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्राचा जप किंवा रुद्राष्टक पठण करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार, जवस हे आरोग्यदायी आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. घरात सुख-शांती आणि मंगलकारक वातावरण यावे, म्हणून चौथ्या सोमवारी हे धान्य शिवाला वाहण्याची प्रथा आहे, असे आदित्य जोशी गुरुजी सांगतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 17, 2025 8:36 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Shravan Somwar: जव की जवस? श्रावणातल्या चौथ्या सोमवारी शिवामूठ कोणती? पाहा महत्त्व

