Vitthal Mandir: विठोबाचा मुक्काम बदलला, आता पंढरीत नव्हे तर इथं भेटणार पांडुरंग!
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Vitthal Mandir: पंढरीचा पांडुरंग पुढील महिनाभर मुख्य मंदिरात नसणार आहे. तर भाविकांना गोपाळपूरच्या विष्णुपद मंदिरात दर्शन घ्यावे लागेल.
पंढरपूर: पंढरीचा पांडुरंग हे अवघ्या महाराष्ट्रासह कर्नाटक आणि देशभरातील भाविकांचं श्रद्धास्थान आहे. आषाढी आणि कार्तिकी वारीला पंढरीच्या वाळवंटात लाखो भाविक दाखल होत असतात. याच विठुरायाबाबत काही परंपरा आणि मान्यता देखील आहेत. दरवर्षी मार्गशीर्ष महिना सुरू झाला की, विठुराया आपला मुक्काम मुख्य मंदिरातून हलवून पंढरपूरपासून दीड ते दोन किमी अंतरावर असणाऱ्या गोपाळपूरच्या विष्णूपद मंदिरात करतात. त्यामुळे या काळात दर्शनासाठी भाविकांची गोपाळपूरला गर्दी असते.
यंदा पारंपरिक अध्यात्मिकता आणि भक्तिभावाचा हा महोत्सव गुरुवारपासून सुरू होत आहे. 19 डिसेंबर 2025 म्हणजेच जवळपास महिनाभर श्री विठुराया गोपाळपूर मुक्कामी असणार आहेत. त्यामुळे विठुरायाच्या विशेष मुक्कामासाठी मंदिर समितीने दर्शन व्यवस्थेत सुधारणा केली असून रांगेसाठी मार्ग, पिण्याच्या पाण्याची सोय आणि वाहतूक नियोजनाची विशेष व्यवस्था केली आहे.
advertisement
काय आहे परंपरा?
दरवर्षी मार्गशीर्ष महिना सुरू झाला की, श्री विठ्ठलाचा मुक्काम पंढरीच्या मुख्य मंदिरातून गोपाळपूरच्या विष्णूपद मंदिरात हलवला जातो. आषाढी वारीनंतर चातुर्मास आणि नंतर येणारी कार्तिकी वारी यामुळे थकलेले विठुराया विश्रांतीसाठी विष्णूपद या ठिकाणी येतात, अशी परंपरा आहे. तसेच या ठिकाणी विठुराया आपल्या सवंगड्यांसह वनभोजनाचा आनंद घेतात, असंही सांगितलं जातं.
advertisement
पंढरीच्या मंदिरात पुन्हा कधी?
view commentsगोपाळपूरच्या मंदिरात विश्रांतीनंतर विठुराया मार्गशीर्ष अमावस्येला पुन्हा पंढरीच्या मुख्य मंदिरात जातात. विष्णूपद या ठिकाणी त्या दिवशी संध्याकाळी एक रथ आणला जातो. रथ ज्वारीच्या ताटाने सजवला जातो. अभिषेक करून दिंडी देखील सजवली जाते आणि पुन्हा विठुराया पंढरीतील स्वगृही परत येतो आणि विराजमान होतो, अशी परंपरा आहे.
Location :
Pandharpur,Solapur,Maharashtra
First Published :
Nov 20, 2025 9:33 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Vitthal Mandir: विठोबाचा मुक्काम बदलला, आता पंढरीत नव्हे तर इथं भेटणार पांडुरंग!









