1993 च्या भूकंपात गावाची मोठी पडझड, पण मंदिराला धक्काही लागला नाही, कोणतं आहे हे जागृत ठिकाण?

Last Updated:

1993 च्या महाप्रलयकारी भूकंपात गावाला हादरा बसला होता. मात्र, हे मंदिर अगदी ज्या स्थितीत होते, त्याच स्थितीत दिमाखात उभे राहिले आहे.

+
श्री

श्री नीलकंठेश्वर महादेव धाराशिव

उदय साबळे, प्रतिनिधी
धाराशिव : 1993 मध्ये लातूर जिल्ह्यातील किल्लारीमध्ये झालेला भूकंप हा आजही संपूर्ण महाराष्ट्राच्या लक्षात आहे. या भूकंपात बलसुर गावात मोठी पडझड झाली होती. मात्र, येथील ग्रामदैवत श्री निळकंठेश्वराचे मंदिर अगदी जसंच्या तसंच राहिले. याच मंदिराबाबत आपण जाणून घेऊयात.
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील बलसुर येथील ग्रामदैवत श्री नीलकंठेश्वर महादेव मंदिर या मंदिराची ही कहाणी आहे. 1993 च्या महाप्रलयकारी भूकंपात गावाला हादरा बसला होता. मात्र, हे मंदिर अगदी ज्या स्थितीत होते, त्याच स्थितीत दिमाखात उभे राहिले आहे.
advertisement
वर्षभर असते भाविकांची मोठी गर्दी -
या मंदिरात वर्षभर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार यानिमित्त आज हे मंदिर गजबजलेले पाहायला मिळाले. निळकंठेश्वराचे हे हजारो वर्षांपूर्वीचे हेमाडपंथी मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम संपूर्ण दगडी आहे. त्यावर सुंदर कोरीव नक्षीकाम करण्यात आले आहे. हेमाडपंथी असलेल्या निळकंठेश्वर मंदिरासमोर एक मोठी दगडी बारव देखील आहे.
advertisement
जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या या निळकंठेश्वर महादेव मंदिरात लोक भक्ती भावाने दर्शनासाठी येतात. वर्षभर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. हे मंदिर प्राचीन आणि हेमाडपंथी शैलीचे आहे. 1993 साली महाप्रलयकारी भूकंपात संपूर्ण गाव भुईसपाट झाले. गावाचे दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसन झाले. मात्र, त्यावेळी या मंदिराला काहीही झाले नाही. त्यामुळे निळकंठेश्वराचं हे मंदिर ग्रामदैवत म्हणून आणि जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते.
advertisement
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
1993 च्या भूकंपात गावाची मोठी पडझड, पण मंदिराला धक्काही लागला नाही, कोणतं आहे हे जागृत ठिकाण?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement