Vastu Tips: असे वॉल पेंटिंग, पोस्टर घरात सुख-शांती आणतात; इंटिरियर करण्यासाठी 4 वास्तु टिप्स
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Vastu Tips Marathi: आकर्षक इंटिरियर करण्यावर लोकांचा भर आहे. 'वॉल डेकोर' करताना घराच्या इंटिरियर थीमची काळजी घेतली जाते, पण हे करताना वास्तुशास्त्राच्या काही नियमांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
मुंबई : रोजच्या धावपळीनंतर घरामध्ये बसल्यावर छान वाटावं, समाधान मिळाव अशी, प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी आकर्षक इंटिरियर करण्यावर लोकांचा भर आहे. 'वॉल डेकोर' करताना घराच्या इंटिरियर थीमची काळजी घेतली जाते, पण हे करताना वास्तुशास्त्राच्या काही नियमांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यामुळे घरामध्ये नकारात्मकता वाढू शकते आणि आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वाढते.
वॉल डेकोर करताना वास्तुशास्त्रातील छोट्या-मोठ्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर घराच्या भिंती सुंदर तर होतीलच शिवाय घरात सकारात्मकताही येईल. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्याकडून अशाच काही वास्तु टिप्स जाणून घेऊया.
लाकडापासून बनवलेले शोपीस
आजकाल अनेक लोक आपल्या घराच्या भिंतींवर लाकडी शोपीस लावत आहेत. हा ट्रेंड बराच वाढला आहे. अशा अनेक शोपीस बाजारात उपलब्ध आहेत, ज्या थेट भिंतीवर टांगल्या जाऊ शकतात. तुम्ही या लाकडी शोपीसचा वापर वॉल डेकोरसाठी करत असाल तर त्यांना पूर्वेच्या भिंतीवर लावा.
advertisement
वॉल पोस्टर
अलिकडे वॉल पेंटिंग किंवा वॉल पेपरचा वापर वाढला आहे. वॉल पेपर किंवा वॉल पेंटिंग तसं घरात कुठेही लावू शकता. परंतु, उत्तरेच्या भिंतीवर मोठा समुद्र किंवा नदी असलेले पेंट लावाल तर घरात सकारात्मकता आणि संपत्तीचा वाढेल.
advertisement
धातूपासून बनवलेल्या वस्तू
लाकडाव्यतिरिक्त, आजकाल धातूपासून बनवलेल्या कलाकृती आणि सजावटीच्या वस्तू देखील घरांच्या भिंतींवर लावल्या जातात. वॉल डेकोरमध्ये धातूच्या वस्तूंचा समावेश करत असाल तर ते घराच्या पश्चिम भिंतीवर लावा. या दिशेला कोणत्याही हिंसक वस्तू किंवा हिंसक प्राण्यांचे चित्र वापरले जाणार नाही याची विशेष काळजी घ्या.
फ्लॉवर पोस्टर्स
तुम्ही वॉल डेकोरसाठी पोस्टर किंवा फुलांचे पेंटिंग वापरणार असाल तर तुम्ही ते तुमच्या घराच्या कोणत्याही भिंतीवर लावू शकता. पण, असे पेंटिंग-पोस्टर भिंतीच्या मध्यभागी लावणे योग्य ठरेल.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 24, 2025 10:15 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Vastu Tips: असे वॉल पेंटिंग, पोस्टर घरात सुख-शांती आणतात; इंटिरियर करण्यासाठी 4 वास्तु टिप्स