Kalki : कोण आहे कल्की? भारतात या राज्यात अवतरणार अन् होईल कलियुगाचा शेवट?
- Published by:sachin Salve
- trending desk
Last Updated:
धनुष्यबाण घेतलेला एक घोडेस्वार असं कल्की अवताराचं वर्णन अग्निपुराणातल्या सोळाव्या अध्यायात आहे.
मुंबई : ज्या वेळी पृथ्वीवर अराजकता निर्माण होते, धर्म संकटात येतो तेव्हा भगवान विष्णू अवतार घेतात, असं धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितलं गेलं आहे. धर्मशास्त्रात भगवान विष्णूचे 24 अवतार सांगितले गेले आहेत. भगवान श्रीराम, भगवान श्रीकृष्ण हे विष्णूचे अवतार मानले जातात. कल्की हा भगवान विष्णूचा दहावा अवतार असेल. या अवतारानंतर कलियुग संपुष्टात येईल असं सांगितलं जातं. कल्की या अवताराविषयी कुतूहल पाहायला मिळतं.
जेव्हा धर्म संकटात येतो तेव्हा भगवान विष्ण पृथ्वीवर अवतार घेऊन पुन्हा धर्मस्थापना करतात. धर्मशास्त्रात भगवान विष्णूच्या 24 अवतारांचा उल्लेख असून त्यापैकी कल्की अवतार होणं अद्याप बाकी आहे. हा अवतार झाल्यावर कलियुग संपेल असं सांगितलं जातं. पौराणिक ग्रंथांनुसार कलियुगाच्या शेवटी भगवान विष्णू कल्कीरूपात अवतार घेतील. सनातन धर्माच्या श्रद्धेनुसार अधर्माचा नाश करण्यासाठी आणि सत्ययुगाच्या पुनरुज्जीवनासाठी हा कल्की अवतार होईल. या अवताराच्या माध्यमातून भगवान विष्णू पापाचा नाश करून धर्माचा झेंडा फडकवतील.
advertisement
कल्की पुराणानुसार, भगवान विष्णू संभळ गावात हा अवतार धारण करतील. उत्तर प्रदेशातल्या मुरादाबादजवळच्या संभळ गावात भगवान विष्णूचा 10 वा कल्की अवतार होईल, असं मानलं जातं.
धनुष्यबाण घेतलेला एक घोडेस्वार असं कल्की अवताराचं वर्णन अग्निपुराणातल्या सोळाव्या अध्यायात आहे. कल्की भगवान देवदत्त नावाच्या पांढऱ्या घोड्यावर बसून येतील आणि पापींचा सर्वनाश करतील. हा अवतार 64 कलांनी युक्त असेल. त्यांचे गुरू भगवान परशुराम असतील. भगवान परशुरामांच्या मार्गदर्शनाखाली भगवान कल्की शिव उपासना करून दिव्य शक्ती मिळवतील आणि अधर्माचा शेवट करतील.
advertisement
धर्मग्रंथानुसार, कलियुगाचा प्रारंभ इसवी सनपूर्व 3012 मध्ये झाला. श्रीकृष्णाने पृथ्वीचा निरोप घेताच कलियुगाचा पहिला टप्पा सुरू झाला. पौराणिक ग्रंथांनुसार, पृथ्वीवर चार लाख 32 वर्षं कलियुग असेल. अजून कलियुगाचा पहिलाच टप्पा सुरू आहे. याचा अर्थ कलियुगातली 3102+2023= 5125 वर्षं संपली असून अजून 426875 वर्षं बाकी आहेत. कल्की अवतार कलियुगाच्या शेवटी होईल.
advertisement
श्रीमद्भागवत पुराणाच्या 12व्या स्कंदातल्या 24व्या श्लोकानुसार, जेव्हा गुरू, सूर्य आणि चंद्र एकाच वेळी पुष्य नक्षत्रात प्रवेश करतील, तेव्हा कल्की भगवान अवतार घेतील. कलियुगाचा शेवट आणि सत्ययुगाची सुरुवात अशा कालावधीत हा अवतार होईल. पौराणिक ग्रंथात भगवान विष्णूच्या दहाव्या अवताराबाबत जी तिथी सांगितली गेली आहे, त्यानुसार भगवान श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या पंचमीला जन्म घेतील.
advertisement
(Disclaimer: इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. ज्योतिषाचार्यांनी आपली मतं व्यक्त केली आहे. त्या न्यूज18 मराठी सहमत नाही. न्यूज 18 मराठी अशा कोणत्याही धार्मिकतेवर आधारीत माहितीची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 06, 2024 6:18 PM IST