महाराष्ट्रातील प्रसिद्ध मंदिर, जिथं महिला फक्त वर्षातून एकदाच घेतात दर्शन
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
महाराष्ट्रातील प्रसिद्ध मंदिरात महिलांना वर्षातून फक्त एकदाच प्रवेश दिला जातो. अमरावतीतील या मंदिराच्या परंपरेबाबत जाणून घेऊ.
प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
अमरावती: महाराष्ट्रात अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत. या मंदिरात वर्षानुवर्षे काही परंपरांचे पालन केले जाते. यातील काही परंपरा या अनोख्या असतात. असंच एक प्रसिद्ध मंदिर अमरावती जिल्ह्यातील शिरजगाव कसबा येथे आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून इथं एक अनोखी परंपरा आहे. या मंदिरात महिला वर्षातून फक्त एकदाच दर्शन घेतात. इतर वेळी महिला मंदिरात प्रवेश करत नाहीत. यामागं नेमकं काय कारण आहे? हे जाणून घेऊ.
advertisement
शिरजगाव कसबा येथे गेले पन्नास वर्षापासून कार्तिक स्वामींचे मंदिर आहे. त्या मंदिरात महिलांना फक्त वर्षातून एक वेळा प्रवेश दिला जातो. तसेच येथील रथोत्सवही विदर्भात प्रसिद्ध आहे. याचे कारण जाणून घेण्यासाठी लोकल18 ने मंदिरातील व्यवस्थापक संजोग दुधे यांच्याशी बातचीत केली. ते सांगतात की, “कार्तिक महिन्यात या गावात त्रिजंता रथोत्सव साजरा केला जातो. तेव्हा 3 लाखांपेक्षा जास्त लोकं येथे येतात. वेगवेगळ्या ठिकाणाहून रथ येतात. त्यांची रॅली संपूर्ण गावात फिरवली जाते.”
advertisement
या दिवशी महिलांना दर्शनाची संधी
यंदा रथोत्सव 18 नोव्हेंबरला आहे. तर या कार्यक्रमाचा सप्ताह 11 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. येथील एक विशेष म्हणजे या मंदिरात महिलांना प्रवेश दिला जात नाही. फक्त वर्षातून 1 दिवस महिला दर्शन घेऊ शकतात, त्याचा सुद्धा एक कालावधी असतो. या वर्षी 15 नोव्हेंबरला रात्री 9.55 मिनिटापासून ते मध्यरात्री 2.58 मिनिटापर्यंत महिला दर्शन घेऊ शकतात, असे दुधे यांनी सांगितलं.
advertisement
महिला का दर्शन घेऊ शकत नाही?
कार्तिकी स्वामी मंदिरात महिलांना दर्शनासाठी का बंदी असते? याबाबत एक आख्यायिका सांगितली जाते. कार्तिक स्वामींचे जेव्हा व्रत सुरू होते. तेव्हा त्यांची आई त्यांच्या जवळ गेल्याने व्रताचा भंग झाला. त्यामुळे कार्तिक स्वामी खूप चिडले आणि त्यांनी आईला सांगितले आजपासून कोणत्याही महिलेने माझ्या समोर येऊ नये. ते अती क्रोधात असल्याने त्यांच्या आईला त्यांचे म्हणणे ऐकावे लागले. तेव्हापासून कार्तिक स्वामी महिलांपासून अलिप्त राहत होते. आता सुद्धा कार्तिक स्वामींच्या मंदिरात महिलांना प्रवेश नाही, महिला जात सुद्धा नाहीत, असंही मंदिराचे व्यवस्थापक सांगतात.
advertisement
दरम्यान, शिरजगाव येथील कार्तिक स्वामी मंदिर हे विदर्भातील प्रसिद्ध मंदिर. सर्वात आधी अचलपूर येथे कार्तिक स्वामींचे मंदिर होते. त्यानंतर 50 वर्षांपूर्वी येथे मंदिराची स्थापना करण्यात आली. येथील रथोत्सव खूप प्रसिद्ध आहे. आजूबाजूच्या गावातील सर्व लोक येथे येतात.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
October 27, 2024 11:34 AM IST