Ashadhi wari : माऊलींची पालखी विठोबा मंदिरात मुक्कामाला, दर्शनासाठी भाविकांची मोठी रिघ
- Published by:News18 Marathi
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
इथे हजारो वारकरी माऊलीच्या पादुकाचं दर्शन घेण्यासाठीसाठी गर्दी करत आहेत. तर लांबच लांब रांगा देखील पाहिला मिळत आहे.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : टाळ वाजे, मृदुंग वाजे, हरीचा विना माऊली चालेल पंढरपूरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणतं माऊलींची म्हणजेच संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यातील भवानी पेठ येथे असलेल्या पालखी विठोबा मंदिरात मुक्कामाला आहे. इथे हजारो वारकरी माऊलींच्या पादुकाचं दर्शन घेण्यासाठीसाठी गर्दी करत आहेत. तर लांबच लांब रांगा देखील पाहिला मिळत आहे. लोकांनी रात्रीपासून दर्शनासाठी साठी गर्दी केली आहे.
advertisement
त्यामुळे 24 तास विठोबा मंदिर दर्शनासाठी मंदिर खुलं आहे. उद्या सकाळी पालखी सहा वाजता सासवड या मार्गासाठी निघेल. तर जवळपास दोन लाख लोकांनी दर्शन हे घेतलं आहे. माऊलींचा पालखी सोहळा हैबतराव बाबा यांनी सुरु केलेला आहे आणि या वारीला अनेक वर्षाची परंपरा देखील लाभलेली आहे.
advertisement
कसा आहे मंदिर परिसर?
मंदिरापासून 50 मीटरवर एक निवासस्थान केवळ वारकऱ्यांसाठी बांधलेले आहे. चार मजली या निवासस्थानात राम मंदिर आहे आणि पुढे सभागृह असून येथे वारकऱ्यांच्या निवासाची सोय केली आहे. माऊलींची पालखी मुक्कामाला आली की या ठिकाणी पादुकांचे, माऊलीच्या अश्वांचे स्वागत केले जाते. आरती करून दही- भाताचा नैवेद्य दाखवला जातो, यालाच माऊलींची दृष्ट काढणे असेही म्हणतात. पहाटे पंचामृताचा अभिषेक होतो, दुपारी मुख्य नैवेद्य झाला की मंदिर संस्थानचा पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. रात्री भजन-जागर असतो, अशा विविध कार्यक्रम आयोजन हे मंदिराच्या वतीने केलं जातं, अशी माहिती मंदिराचे विश्वस्त प्रमोद बेंगरूट यांनी दिली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
July 01, 2024 9:24 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
Ashadhi wari : माऊलींची पालखी विठोबा मंदिरात मुक्कामाला, दर्शनासाठी भाविकांची मोठी रिघ