देवी देते दिवसातून 3 रूपात दर्शन; महाराष्ट्रातील हे प्रसिद्ध मंदिर माहितीये का? Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
नवसाला पावणारी आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी देवी म्हणून कोराडी निवासिनीवर भाविकांची अपार श्रद्धा आहे.
नागपूर, 12 ऑक्टोबर : शारदीय नवरात्रोत्सव प्रारंभ होण्यास अवघा काही अवधी शिल्लक राहिला असून त्यासाठी देशभरात साऱ्यांचीच उत्सुकता शिगेला पोहचली आहे. होऊ घातलेल्या नवरात्र उत्सवासाठी देशभरातील सर्व देवींचे मंदिरे आकर्षकरीत्या सजली असुन नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये सर्वत्र उत्साह आणि नवंचैतन्याचे वातावरण असणार आहे. त्याच अनुषंगाने नागपुरनगरीची आदिशक्ती असलेल्या आणि तमाम नागपूरकरांसह अनेकांचे श्रद्धास्थान असलेले कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा मंदिर देखील सज्ज झाले आहे.
शारदीय नवरात्र उत्सवानिमित्य देशभरातून महालक्ष्मी जगदंबा देवीचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक दरवर्षी कोराडी येथे दाखल होत असतात. नवसाला पावणारी आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी देवी म्हणून कोराडी निवासिनीवर भाविकांची अपार श्रद्धा आहे. विशेष बाब म्हणजे महालक्ष्मी जगदंबा देवी दिवसांतून तीन रुपात भाविकांना दर्शन देते अशी आख्यायिका प्रचलित आहे.
advertisement
तीन रूपात दर्शन देणारी देवी
विदर्भात अनेक धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असणारी मंदिरे आहेत. नागपूर शहरापासून दक्षिणेस अवघ्या 20 किमी अंतरावर असलेले कोराडी महालक्ष्मी जगदंबा मंदिर हे तमाम भाविकांचे शक्तीपीठ आहे. दरवर्षी आश्विन महिन्यातील नवरात्री आणि शारदीय नवरात्रोत्सवात कोराडी मंदिरात मोठी गर्दी होते. या दिवसात येथे यात्रेचे स्वरूप प्राप्त झालेले असते. महालक्ष्मी जगदंबा देवी भक्तांना दररोज तीन रुपात दर्शन देते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यात सकाळी देवी कुमारिका रूपात असते, दुपारी देवी सुहासिनी रुपात असते तर संध्याकाळी देवी प्रौढ स्त्रीच्या रुपात दर्शन देते अशी आख्यायिका आहे.
advertisement
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान
कोराडी महालक्ष्मी जगदंबा मंदिर हे मध्य भारतातील एक महत्त्वाचे मंदिर आहे. वर्षाकाठी येथे लाखो भाविक येथे येत असतात. मागील शारदीय नवरात्रोत्सव आणि आश्विन नवरात्रोत्सवात 18 लाख 60 हजार भाविकांनी देवीचे दर्शन घेतले आहे. जगदंबा आणि महालक्ष्मी अशी दोन्ही रुपे एकाच देवीमध्ये बघायला मिळतात. देवीच्या मंदिराचा इतिहास शेकडो वर्ष पुरातन असून नवसाला पावणारी देवी म्हणून कोराडी देवी मानली जाते, अशी माहिती राघवेंद्र टोकेकर यांनी दिली.
advertisement
भक्त निवास बनलं मल्टी ऑर्गन ट्रान्सप्लांट हॉस्पिटल
अध्यात्मिक, पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व लाभलेला या महालक्ष्मी जगदंबा मंदिराचे नुकतेच नूतनीकरण आणि सुशोभिकरणाचे काम पूर्ण झाले. त्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात अधिक भर पडली आहे. या दरम्यान भक्तांच्या निवासासाठी 165 खोल्यांचे सर्व गोष्टींनी सुसज्ज असे भक्त निवास बांधण्याचे ठरले होते. मात्र मधल्या काळात कोरोना संकट आले आणि या पार्श्वभूमीवर नागरिकांची गरज लक्ष्यात घेता भक्त निवास ऐवजी मल्टी ऑर्गन ट्रान्सप्लांट हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय महालक्ष्मी जगदंबा कोराडी मंदिर प्रशासनाने घेतला. मध्य भारतातील एक महत्त्वपूर्ण आणि सर्व सुविधांनी सुसज्ज असे हॉस्पिटल लोकांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे.
advertisement
तलावात उभारणार 151 फूट हनुमान मूर्ती
मंदिराच्या सौंदर्यकरणाकरिता विशेष लक्ष मंदिर प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे. मंदिरालगत असलेल्या तलावात 151 फूट हनुमान मूर्तीचे कार्य प्रगतीपथावर असून आगामी काळात एक ते दीड वर्षात हे काम पूर्ण होणार आहे. दर्शनासोबतच मनोरंजन आणि पर्यटन सोबतच स्थानिकांच्या रोजगाराला हातभार लागावा यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती राघवेंद्र टोकेकर यांनी दिली.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
October 12, 2023 7:06 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
देवी देते दिवसातून 3 रूपात दर्शन; महाराष्ट्रातील हे प्रसिद्ध मंदिर माहितीये का? Video