advertisement

भारतात किती वेळ असणार चंद्रग्रहण? 'या' वेळेत चुकूनही करू नका 'ही' कामं!

Last Updated:

ज, 3 मार्च 2026 रोजी संपूर्ण जग वर्षातील पहिल्या खग्रास चंद्रग्रहणाचे साक्षीदार होत आहे. भारतात हे ग्रहण 'ग्रस्तोदित' स्वरूपात दिसणार आहे, म्हणजेच जेव्हा चंद्र उगवेल, तेव्हा तो आधीच ग्रहणाच्या सावलीत असेल.

News18
News18
Chandra Grahan Time : आज, 3 मार्च 2026 रोजी संपूर्ण जग वर्षातील पहिल्या खग्रास चंद्रग्रहणाचे साक्षीदार होत आहे. भारतात हे ग्रहण 'ग्रस्तोदित' स्वरूपात दिसणार आहे, म्हणजेच जेव्हा चंद्र उगवेल, तेव्हा तो आधीच ग्रहणाच्या सावलीत असेल. खगोलप्रेमींसाठी ही एक पर्वणी असली तरी, ज्योतिषशास्त्रानुसार या काळात काही गोष्टींची खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक मानले गेले आहे.
भारतात ग्रहणाची वेळ आणि स्वरूप
भारतात हे ग्रहण अत्यंत कमी वेळेसाठी दिसणार आहे, कारण चंद्रोदयाच्या वेळीच ग्रहणाची सांगता जवळ आलेली असेल. खग्रास अवस्था दुपारी 4:34 ते 5:33 पर्यंत असेल. या वेळी भारतात चंद्र क्षितिजाखाली असेल. तर ग्रहणाची समाप्ती 6 वाजून 47 मिनिटांनी होईल. मुंबई आणि पुणे यांसारख्या शहरांमध्ये चंद्र उशिरा उदय होत असल्याने, हे दृश्य केवळ 3 ते 7 मिनिटांसाठीच पाहता येईल.
advertisement
चुकूनही करू नका 'या' 3 गोष्टी
धर्मशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहण काळात पर्यावरणात नकारात्मक लहरींचे प्रमाण वाढते, त्यामुळे या 3 गोष्टी टाळाव्यात. ग्रहणाच्या सूतक काळात अन्न शिजवणे किंवा खाणे टाळावे. वैज्ञानिकदृष्ट्या, ग्रहण काळात अल्ट्राव्हायोलेट किरणांच्या अभावामुळे अन्नामध्ये जीवाणूंची वाढ वेगाने होते, ज्यामुळे ते पचण्यास जड किंवा विषारी ठरू शकते. ग्रहण काळात झोपणे अशुभ मानले जाते. तसेच, या काळात शारीरिक संबंध ठेवणे वर्ज्य आहे, कारण त्याचा नकारात्मक प्रभाव आरोग्यावर आणि मानसिक स्थितीवर होतो, असे मानले जाते.
advertisement
हे चंद्रग्रहण कुठे कुठे दिसणार?
हे खग्रास चंद्रग्रहण जगाच्या मोठ्या भागात दिसणार आहे. आजचे चंद्रग्रहण पूर्ण भारतभर विशेषतः आसाम आणि बंगालमध्ये जास्त काळ दिसेल. तर जगात संपूर्ण आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर आणि दक्षिण अमेरिका, पॅसिफिक आणि हिंद महासागराच्या क्षेत्रात हे ग्रहण स्पष्ट दिसेल.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
भारतात किती वेळ असणार चंद्रग्रहण? 'या' वेळेत चुकूनही करू नका 'ही' कामं!
Next Article
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement