एकाच छताखाली मिळणार वेद आणि शेतीचे शिक्षण, याठिकाणी सुरू होणार अनोखा प्रयत्न
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
येथे तुम्हाला एकाच छताखाली वेदांच्या ज्ञानासोबत कृषीचे शिक्षण मिळेल. तसेच उपासना पद्धतीपासून ते विधी आणि उपवास आणि सणांचे महत्त्व समजावून सांगितले जाईल.
अभिषेक जायसवाल, प्रतिनिधी
वाराणसी : देशामध्ये शिक्षणाचे विविध प्रयत्न केले जात असताना यातच आता आणखी एक अनोखा प्रयोग केला जाणार आहे. उत्तरप्रदेशातील काशी या धार्मिक नगरीमध्ये कृषी अभ्यासासाठी एक अनोखे केंद्र उघडण्यात येणार आहे. या केंद्रात वेदांसोबतच शेतकऱ्यांना जुन्या पद्धतीनुसार शेतीचे शिक्षण दिले जाणार आहे. यासाठी दक्षिणेतील कांची कामकोटी मठाने पुढाकार घेतला आहे. लवकरच काशीमध्ये हे केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या केंद्रात एकूण 4 प्रकारचे अभ्यासक्रम चालवले जाणार आहेत. यामध्ये वेदांपासून ते शेतीपर्यंतचा अभ्यास असेल.
advertisement
काशी येथील कांची कामकोटी मठाचे व्यवस्थापक व्ही एस सुब्रमण्यम मणि यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, शंकराचार्य स्वामी शंकर विजयेंद्र सरस्वती यांच्या आदेशानुसार हे केंद्र उत्तर आणि दक्षिण भारताच्या संगमासाठी उघडण्यात येत आहे. काशी ते प्रयागराज दरम्यानच्या सनातन धर्म सेवा ग्रामच्या या केंद्राच्या उभारणीचे कामही सुरू झाले आहे. येथे तुम्हाला एकाच छताखाली वेदांच्या ज्ञानासोबत कृषीचे शिक्षण मिळेल. तसेच उपासना पद्धतीपासून ते विधी आणि उपवास आणि सणांचे महत्त्व समजावून सांगितले जाईल.
advertisement
भारतीय सनातन संस्कृती इटलीच्या नवरा-बायकोला भावली, वाराणसीत घेतला मोठा निर्णय
वी एस सुब्रह्मण्यम मणि यांनी सांगितले की, या केंद्रात चार प्रकारचे शिक्षण दिले जाणार आहे. याअंतर्गत पूर्णवेळ आणि अर्धवेळ वेदविद्या, ऋषी आणि शेतीचे शिक्षण दिले जाणार आहे. आपल्या ऋषीमुनींनी प्राचीन काळी शेतीसाठी वापरलेल्या पद्धती आणि तंत्रांबद्दल माहिती या अभ्यासक्रमात शिकवली जाईल. तसेच या अंतर्गत शेतकरी आणि त्यात रस असणाऱ्यांना सेंद्रिय शेतीबद्दल शिकवले जाईल.
advertisement
व्ही एस सुब्रमण्यम मणी यांनी पुढे सांगितले की, या केंद्रात ऋषी कृषी व्यतिरिक्त वेदविद्या देखील दोन योजनांतर्गत शिकविली जाईल. पहिली पूर्णवेळ वेदविद्या योजना असेल. या अंतर्गत श्रुती परंपरेतून वेदविद्येचा अभ्यास केला जाईल. यामध्ये पूजापद्धतीपासून ते कर्मकांडापर्यंतचे संपूर्ण शिक्षण दिले जाणार आहे. याशिवाय दुसऱ्या अर्धवेळ वेद शिक्षण योजनेअंतर्गतही अभ्यास केला जाणार आहे. यामध्ये वेदांच्या अभ्यासासोबत आधुनिक शिक्षणाचा समावेश करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
view commentsLocation :
Varanasi,Uttar Pradesh
First Published :
March 10, 2024 1:54 PM IST


