advertisement

मृत्यूनंतर शरीर दफन करणं चांगलं की अग्नी देणं? गरुड पुराणात सांगितलंय रहस्य!

Last Updated:

ज्या व्यक्तीने पृथ्वीवर जन्म घेतला, ती कधीच शरीरानं अजरामर राहत नाही. पृथ्वीवर येणाऱ्या प्रत्येकाचा अंत ठरलेला असतो. मग अंत्यसंस्कार कोणत्याही पद्धतीनं झाले तरी ते करण्यासाठी कोणीतरी मागे आहे हे भाग्याचं मानलं जातं.

काय होतं मृत्यूनंतर?
काय होतं मृत्यूनंतर?
आर्या झा, प्रतिनिधी
मधुबनी : आयुष्य मनसोक्त जगून घ्यावं, असं म्हणतात ते काही खोटं नाही. कारण प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू हा ठरलेलाच असतो. तो कधी होईल, कसा होईल हे आपल्या हातात नसतं, परंतु कधीतरी होणार हे निश्चित. हेच जीवनाचं कटू सत्य आहे.
ज्या व्यक्तीने पृथ्वीवर जन्म घेतला, ती कधीच शरीरानं अजरामर राहत नाही. पृथ्वीवर येणाऱ्या प्रत्येकाचा अंत ठरलेला असतो. मग काही ठिकाणी मृत्यूनंतर व्यक्तीचं शरीर दफन करतात, तर काही ठिकाणी अग्नी देतात. काहीही असलं तरी, अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणीतरी मागे आहे, ही बाब भाग्याची मानली जाते.
advertisement
हिंदू धर्मात जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक व्यक्तीवर एकूण 16 संस्कार केले जातात. अंत्यसंस्कारही त्यापैकीच एक. ज्योतिषी आचार्य राम कुमार झा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गरुड पुराणात सांगितलंय की, मानवी शरीर हे पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश या 5 तत्त्वांनी तयार झालेलं आहे. मृत्यूनंतर हे पंचतत्त्व मिळायला हवे. अर्थात मृत व्यक्तीला अग्नी द्यायला हवा. परंतु यामागे नेमकं कारण काय, जाणून घेऊया.
advertisement
ज्योतिषांनी सांगितलं की, प्रत्येक व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिचा आत्मा निघून जातो. मग उरतं ते फक्त शरीर. त्या शरीरातून कालांतराने दुर्गंधी येऊ लागते. म्हणूनच शरीर अग्नीत एकरूप झालेलं उत्तम. तसंच उरलेल्या अस्थी पाण्यात प्रवाहित कराव्या. दरम्यान, अंत्यसंस्कार कधीच रात्री करू नये, तर संध्याकाळी करावे, असंही म्हटलं जातं.
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
मृत्यूनंतर शरीर दफन करणं चांगलं की अग्नी देणं? गरुड पुराणात सांगितलंय रहस्य!
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement