advertisement

Garuda Purana: जिवंतपणी या गोष्टी करणाऱ्यांना मिळते मोक्ष प्राप्ती? गरुड पुराणात सांगितलेत या 4 गोष्टी

Last Updated:

Garuda Purana: विज्ञान कितीही पुढे गेले असले तरी मृत्यू अटळ आहे, हे सर्वांना मान्य करावं लागतं. जन्म-मृत्युचा फेरा कोणाला चुकला नाही, असं म्हणतात.

News18
News18
मुंबई : जन्म-मृत्यूला कोणी रोखू शकलं नाही, ती वेळ कोणाच्या हातात नाही. विज्ञान कितीही पुढे गेले असले तरी मृत्यू अटळ आहे, हे सर्वांना मान्य करावं लागतं. जन्म-मृत्युचा फेरा कोणाला चुकला नाही, असं म्हणतात. आयुष्यात खऱ्या सुखाचा शोध घेणारे या जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न करतात. मृत्यूनंतर मोक्ष मिळण्याची अभिलाषा प्रत्येकाची असते. जिवंतपणी काही विशेष गोष्टी करायला हव्या, ज्यामुळे व्यक्तीला मोक्ष प्राप्ती होण्यास मदत होते. याविषयी गरुड पुराणात सांगितलेल्या काही गोष्टी जाणून घेऊ.
हिंदू धर्मातील महापुराण मानल्या जाणाऱ्या गरुड पुराणात जन्म आणि मृत्यूशी संबंधित अनेक रहस्ये सांगण्यात आली आहेत. यामध्ये पाप-पुण्य आणि कर्माचा हिशोब देखील सांगितला आहे. कोणत्या गोष्टी केल्यानं मनुष्य नरकात जातो आणि कोणत्या कृती त्याला मोक्ष प्राप्त करण्यास मदत करतात, याचा उल्लेख आहे. भगवान विष्णू आणि त्यांचे वाहन पक्षी राजा गरुड यांच्यातील संवादावर आधारित गरुड पुराणात असे म्हटले आहे की, एखाद्या व्यक्तीनं आपल्या आयुष्यात 4 गोष्टी केल्या तर त्याचा आत्मा मृत्यूनंतर मोक्षाकडे जातो. म्हणजे आत्म्यासाठी मोक्षाचे दरवाजे उघडतात. थोडक्यात जाणून घेऊया या 4 गोष्टींबद्दल..
advertisement
कोणती गोष्टी माणसाला मोक्ष प्राप्ती देतात -
- भगवान विष्णूला तुळशी अत्यंत प्रिय आहे. गरुड पुराणात, तुळशीचे वर्णन आपल्याला परमधामात नेणारी म्हणूनही केले आहे. एखाद्या व्यक्तीनं तुळशीच्या रोपाची नित्य पूजा केली तर त्याला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो. याशिवाय मरणासन्न व्यक्तीच्या तोंडात तुळशीची पाने टाकल्यानं त्याच्यासाठी मोक्षाचे दरवाजे उघडतात, असे मानले जाते.
advertisement
- गरुड पुराणानुसार, व्यक्तीने नेहमी श्री हरी नामाचा जप केला पाहिजे. तसेच शेवटच्या क्षणी नारायणाचे नाव घेऊन त्यांच्या दशावतारांची पूजा केल्यानंही मोक्ष प्राप्त होतो, असे मानले जाते.
- हिंदू धार्मिक श्रद्धेनुसार एकादशीचे व्रत मोक्ष देणारे मानले जाते. एकादशी व्रताचे महत्त्व गरुड पुराणातही सांगण्यात आलं असून त्यानुसार जो व्यक्ती एकादशीचे व्रत करतो, त्याची सर्व पापे नष्ट होतात आणि त्याला मोक्षही प्राप्त होतो.
advertisement
- गरुड पुराणानुसार, कलियुगात गंगा स्नान केल्यानं माणसाची पापे नष्ट होतात आणि त्याच्यासाठी मोक्षाचे दरवाजे उघडतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Garuda Purana: जिवंतपणी या गोष्टी करणाऱ्यांना मिळते मोक्ष प्राप्ती? गरुड पुराणात सांगितलेत या 4 गोष्टी
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement