सोमवती अमावस्या कधी आहे? या दिवशी पितृदोषाच्या मुक्तीसाठी काय कराल? ज्योतिष सांगतात...
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
ज्येष्ठ अमावस्या यंदा 26 मे रोजी सोमवारी असून यामुळे यंदा सोमवती अमावस्या योग येतो आहे. या दिवशी सकाळी गंगास्नान, तर्पण, पिंडदान, दानधर्म, व्रत आणि...
सनातन धर्मात अमावस्या तिथीला खूप महत्त्व दिलं जातं. अशी श्रद्धा आहे की, अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे आणि दानधर्म करणे महत्त्वाचं आहे. धार्मिक दृष्ट्या ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या तिथीला खूप महत्त्व आहे. ही तिथी आध्यात्मिक शुद्धी आणि पूजेसाठीही खूप शुभ मानली जाते.
अमावस्येच्या दिवशी पितरांचा आशीर्वाद (blessings of ancestors) मिळवण्यासाठी नियमानुसार ध्यान आणि तर्पणादी विधी केले जातात, त्यामुळे या रिपोर्टमध्ये सविस्तर जाणून घेऊया की ज्येष्ठ महिन्याची अमावस्या कधी आहे? शुभ मुहूर्त काय आहे आणि तिचं महत्त्व काय आहे....
या दिवशी आहे शुभ मुहूर्त
अयोध्या येथील ज्योतिषी पंडित कल्की राम सांगतात की, वैदिक पंचांगानुसार, ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या तिथी 26 मे रोजी दुपारी 12 वाजून 11 मिनिटांनी सुरू होईल आणि 27 मे रोजी सकाळी 8 वाजून 31 मिनिटांनी समाप्त होईल. उदया तिथीनुसार, ज्येष्ठ महिन्याची अमावस्या तिथी 26 मे रोजी साजरी केली जाईल. या दिवशी सोमवार आहे, त्यामुळे या अमावस्येला सोमवती अमावस्या असंही म्हटलं जाईल.
advertisement
तर्पण आणि पिंडदान करतात
धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी लोक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात. या दिवशी पितरांसाठी तर्पण आणि पिंडदान विधी केले जातात. याशिवाय, गरीब आणि गरजूंना दानधर्म करणं देखील या दिवशी खूप शुभ मानलं जातं. असं केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो.
...असं केल्याने पितर होतात प्रसन्न
सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याचाही नियम आहे. पूजेदरम्यान, पिंपळाच्या झाडाला सात वेळा प्रदक्षिणा घालाव्यात आणि झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावून त्यात काळे तीळ टाकावेत. त्यानंतर पितृ चालिसाचं पठण करावं. असं केल्याने पितर खूप प्रसन्न होतात.
advertisement
हे ही वाचा : पतीसोबत होणार नाही वाद, पत्नीने करावा 'या' दिवशी करावा 'हा' खास उपाय, मिळेल सुख अन् समृद्धी
हे ही वाचा : भोलेनाथाला प्रिय 'हे' फळ, आयुर्वेदात आहे खूप महत्त्व, शेकडो आजार होतात बरे, कसा कराल वापर?
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 09, 2025 4:35 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
सोमवती अमावस्या कधी आहे? या दिवशी पितृदोषाच्या मुक्तीसाठी काय कराल? ज्योतिष सांगतात...