घरात पूर्वजांचे फोटो कुठे लावावे? 'या' चुका केल्यास येऊ शकतं मोठे संकट, ज्योतिष सांगतात...
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
आचार्य आनंद भारद्वाज सांगतात की, वास्तुशास्त्रानुसार पूर्वजांचे फोटो दक्षिण दिशेला लावणे शुभ मानले जाते. यमाची दिशा असलेल्या दक्षिण दिशेला फोटो लावल्याने घरात सुख-समृद्धी नांदते. मात्र...
वास्तुशास्त्रामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामुळे आपल्या जीवनात सकारात्मक आणि नकारात्मक बदल होऊ शकतात. घरात कोणत्या ठिकाणी कोणतं चित्र किंवा फोटो लावावा, याबद्दलही वास्तुशास्त्र माहिती देतं. देव-देवतांच्या चित्रांसोबतच अनेकजण घरात आपल्या पूर्वजांचे फोटोही लावतात. पण असं करताना अनेकदा काही चुका केल्या जातात. जाणून घ्या, पूर्वजांचे फोटो घरात कुठे आणि कसे लावावेत.
घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते आणि...
उज्जैनचे आचार्य आनंद भारद्वाज यांनी सांगितलं की, वास्तुशास्त्रानुसार, घरात आपल्या पूर्वजांचे एकापेक्षा जास्त फोटो कधीही लावू नयेत. गेलेल्या पूर्वजांचे एकापेक्षा जास्त फोटो लावल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते आणि शुभ परिणामांऐवजी अशुभ परिणाम दिसून येतात, घरात अडचणी वाढू शकतात. चला जाणून घेऊया, पूर्वजांचे फोटो कोणत्या दिशेला लावणं शुभ आहे आणि कोणत्या ठिकाणी लावणं अशुभ?
advertisement
पूर्वजांचे फोटो लावण्याची योग्य दिशा कोणती?
वास्तुशास्त्रानुसार, पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा सर्वात चांगली मानली जाते. दक्षिण दिशेला पूर्वजांचे फोटो लावताना त्यांचा चेहरा उत्तर दिशेकडे असावा. दक्षिण दिशा यमदेवाची दिशा मानली जाते. या दिशेला पूर्वजांचे फोटो लावल्यास घरात सुख-समृद्धी टिकून राहते आणि पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो असं मानलं जातं.
कोणत्या ठिकाणी फोटो लावू नये?
शास्त्रानुसार, पूर्वजांचे फोटो कधीही देवघरात किंवा बेडरूममध्ये लावू नये. असं केल्याने घरातील सदस्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो, ज्यामुळे कुटुंबात अनेक प्रकारचे आजार पसरू लागतात असं म्हटलं जातं. तसेच, ड्रॉईंग रूम किंवा घरात येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या सतत नजरेत येईल अशा ठिकाणीही पूर्वजांचे फोटो लावणं टाळावं.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 12, 2025 5:21 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
घरात पूर्वजांचे फोटो कुठे लावावे? 'या' चुका केल्यास येऊ शकतं मोठे संकट, ज्योतिष सांगतात...