महाभारताच्या युद्धात जेवण कोण बनवायचं? कधीच उपाशी राहिले नाहीत सैनिक, कसं काय?

Last Updated:

असं म्हणतात की, महाभारत युद्धात जवळपास 45 लाखांहून अधिक सैनिक सामील झाले होते. या लाखो लोकांसाठी जेवण कोण बनवत असे बरं. तसंच युद्धात दररोज हजारो लोक मारले जायचे, मग जेवण किती बनवायचं याचा हिशेब कोण ठेवायचं?

News18
News18
नवी दिल्ली : कुरुक्षेत्रात झालेल्या महाभारत युद्धात लाखो सैनिक सहभागी झाले होते. या लाखो लोकांसाठी जेवण कोण बनवत असे बरं. तसंच युद्धात दररोज हजारो लोक मारले जायचे, मग जेवण किती बनवायचं याचा हिशेब कोण ठेवायचं?
असं म्हणतात की, महाभारत युद्धात जवळपास 45 लाखांहून अधिक सैनिक सामील झाले होते. या युद्धाची जेव्हा घोषणा झाली तेव्हा सर्व राज्यांचे राजे आपला पक्ष निवडत होते. कोणी कौरवांकडून लढायचं आणि कोणी पांडवांकडून लढायचं हे ठरवलं जात होतं. यादरम्यान असेही काही राजे होते की, ज्यांनी तटस्थ राहणं पसंत केलं होतं. त्यातलेच एक होते उडुपीचे राजा. त्यांनी भगवान श्रीकृष्ण यांच्या सांगण्यावरून जेवणाची व्यवस्था सांभाळली.
advertisement
पौराणिक कथांनुसार, त्यांनी श्रीकृष्णाजवळ जाऊन म्हटलं होतं की, 'या युद्धात लाखो सैनिक सहभागी होतील, एकमेकांशी लढतील, अशावेळी त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था कोण करणार? अन्नपाणी मिळालं नाही, तर कोणता सैनिक लढूच शकणार नाही. माझी अशी इच्छा आहे की, दोन्ही बाजूच्या सैनिकांसाठी जेवणाची व्यवस्था मीच करावी.' त्यासाठी भगवान श्रीकृष्ण यांनी परवानगी दिली.
मग राजासमोर हा मोठा प्रश्न होता की, 'दररोज नेमकं जेवण बनवायचं किती? जेवण उरायला नको आणि कमी तर अजिबात पडायला नको.' राजाच्या या चिंतेचं निराकरण भगवान श्रीकृष्ण यांनी केलं. त्यानंतर 18 दिवस चाललेल्या या युद्धात कधीच जेवण उरलं नाही आणि कमीही पडलं नाही. परंतु असं नेमकं घडलं कसं?
advertisement
युद्ध संपल्यानंतर युधिष्ठिरने उडुपीच्या राजाला विचारलं की, 'तुम्हाला आज किती जेवण बनवायचं हे कसं कळायचं?' तेव्हा राजाने याचं श्रेय भगवान श्रीकृष्ण यांना दिलं. राजा म्हणाले, 'भगवान श्रीकृष्ण दररोज शिजवलेले शेंगदाणे खायचे. जर त्यांनी आज 10 शेंगदाणे खाल्ले तर मी समजून जायचो की, उद्या 10 हजार सैनिक मारले जाणार आहेत. मग 10 हजार सैनिकांचं जेवण नाही बनवलं जायचं. अशाप्रकारे भगवान श्रीकृष्ण यांच्यामुळेच दररोज सैनिकांना पोटभर जेवण मिळायचं आणि अन्नाचा अपमानही व्हायचा नाही.'
मराठी बातम्या/अध्यात्म/
महाभारताच्या युद्धात जेवण कोण बनवायचं? कधीच उपाशी राहिले नाहीत सैनिक, कसं काय?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement