मकर संक्रांतीच्या काळात लहान मुलांचे का केले जाते बोरन्हाण? काय आहे नेमकी परंपरा? Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priyanka Jagtap
Last Updated:
लहान मुलांसाठी पारंपरिक बोरन्हाण करण्याची पद्धत आहे. मग ती परंपरा सर्वत्र कशी साजरी केली जाते? याबद्दलच गुरुजी नयनेश जोशी यांच्याकडून जाणून घेणार आहोत.
प्रियंका जगताप, प्रतिनिधी
मुंबई : नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. यंदा मकर संक्रांत आज 14 जानेवारीला आहे. महिलांसाठी हळदीकुंकूचा तर पुरुष मंडळी आणि बच्चे कंपनीमध्ये पतंग उडवण्याचा उत्साह असतोच. पण या सर्वांमध्ये लहान मुलांसाठी पारंपरिक बोरन्हाण करण्याची पद्धत आहे. मग ती परंपरा सर्वत्र कशी साजरी केली जाते. त्यामागील शास्त्रीय कारण काय तसेच किती वर्षांपर्यंतच्या लहान मुलाचं बोरन्हाण केलं जातं? याबद्दलच गुरुजी नयनेश जोशी यांच्याकडून जाणून घेणार आहोत.
advertisement
हिंदू धर्मात मकर संक्रांतीला अधिक महत्त्व आहे. यंदा 14 जानेवारी 2025 रोजी मकर संक्रांत साजरी झाली आणि 12 फेब्रुवारीला 2025 रथसप्तमी आहे. मकर संक्रांत ते रथसप्तमीच्या काळात तान्ह्या बाळापासून ते पाच वर्षांच्या मुलांना बोरन्हाण घातलं जातं. हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो. शिशूसंस्कार म्हणून लहान मुलांना बोरन्हाण घालण्यात येतं. लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी बोरन्हाण घालण्याची परंपरा आहे, असं गुरुजी नयनेश जोशी यांनी सांगतील.
advertisement
त्याचप्रमाणे बोरन्हाणसंदर्भात अशीही एक आख्यायिका आहे की, पूर्वी करी नावाचा एक राक्षस होता. त्याकरी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये, यासाठी सर्वात आधी हे कृष्णांवर केलं गेलं आणि त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरन्हाण केलं जातं. तसेच शास्त्राप्रमाणे बघितलं तर, या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात. लहान मुलांना या बदलत्या ऋतुची बाधा होऊ नये म्हणून देखील बोरन्हाण केलं जातं.
advertisement
या काळात मिळणारी फळं मुलांनी खावी, खाऊ मुलांनी खावा म्हणूनही त्यांना मज्जा म्हणून अशा प्रकारे खाऊ वेचून खाण्याची संधी दिली जाते. बोरन्हाण करताना लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून नटवतात. पाटावर बसवून त्यांचं औक्षण करतात. आजूबाजूच्या लहान मुलांना घरी बोलावतात. मग घरातील बाळाच्या डोक्यावरुन मुरमुरे, बत्तासे, तिळाच्या रेवड्या, बिस्कीट, गोळ्या, बोरं, उसाचे तुकडे असे सर्व पदार्थ एकत्र करून टाकले जातात. यावेळी उपस्थित असलेली लहान मुलं हा खाऊ गोळा करुन खातात, अशा प्रकारे बोरन्हाण घातलं जातं. या वेळी अनेक खेळ खेळून मुलांच्या बोरन्हाण्याचा कार्यक्रम पार पडला जातो, असं गुरुजी नयनेश जोशी यांनी सांगितलं.
advertisement
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 14, 2025 12:52 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
मकर संक्रांतीच्या काळात लहान मुलांचे का केले जाते बोरन्हाण? काय आहे नेमकी परंपरा? Video