उद्या शुभ मुहूर्त असूनही लग्नाची इच्छा होणार नाही पूर्ण, 'हे' कारण वाचाच; अन्यथा संसारावर होऊ शकतो वाईट परिणाम

Last Updated:

हिंदू शास्त्रानुसार, वसंत पंचमी हा वर्षातील अशा दुर्मिळ दिवसांपैकी एक आहे ज्याला 'अबूझ मुहूर्त' मानले जाते. म्हणजेच, या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी पंचांग पाहण्याची गरज नसते.

News18
News18
Vasant Panchami 2026 : उद्या संपूर्ण देशात 'वसंत पंचमी'चा सण साजरा केला जाईल. हिंदू शास्त्रानुसार, वसंत पंचमी हा वर्षातील अशा दुर्मिळ दिवसांपैकी एक आहे ज्याला 'अबूझ मुहूर्त' मानले जाते. म्हणजेच, या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी पंचांग पाहण्याची गरज नसते. असे असूनही, 2026 च्या वसंत पंचमीला लग्नाचे सनई-चौघडे वाजणार नाहीत. अनेक ठिकाणी विवाहास मनाई करण्यात आली आहे. पण या मागे नेमकं कारण काय? जाणून घेऊयात.
विवाह न होण्यामागचे मुख्य कारण: शुक्र ग्रहाचा अस्त
ज्योतिषशास्त्रामध्ये विवाहासाठी 'गुरु' आणि 'शुक्र' या दोन ग्रहांचे 'उदय' असणे अत्यंत आवश्यक मानले जाते. शुक्र हा वैवाहिक सुख, प्रेम, रोमान्स आणि ऐश्वर्याचा कारक मानला जातो. जर शुक्र ग्रह आकाशात लुप्त किंवा 'अस्त' असेल, तर त्या काळात केलेले विवाह यशस्वी होत नाहीत किंवा वैवाहिक जीवनात अनेक अडचणी येतात, अशी मान्यता आहे. 2026 च्या सुरुवातीलाच शुक्र ग्रह अस्त अवस्थेत आहे. शुक्र डिसेंबर 2026 च्या दुसऱ्या आठवड्यात अस्त झाला असून तो 1 फेब्रुवारी 2026 रोजी उदय होणार आहे. 23 जानेवारीला वसंत पंचमी असताना शुक्र अस्त असल्याने, जरी हा दिवस 'अबूझ मुहूर्त' असला तरी विवाहासाठी तो वर्ज्य मानला जात आहे.
advertisement
वैवाहिक आयुष्यावर होणारा परिणाम
शास्त्रानुसार, शुक्राच्या अस्त काळात विवाह केल्यास पती-पत्नीमध्ये सामंजस्याचा अभाव, आरोग्याच्या समस्या किंवा आर्थिक ओढताण जाणवू शकते. म्हणूनच ज्योतिषी या काळात विवाहाचा सल्ला देत नाहीत.
विवाहित जोडपे वसंत पंचमीला या गोष्टी करू शकतात
यावर्षी वसंत पंचमीला लग्न नसले तरी, ज्यांचे आधीच लग्न झाले आहे त्यांनी योग्य विधींनी देवी सरस्वतीची पूजा करावी. या दिवशी घरी देवी सरस्वतीची पूजा केल्याने अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि शुभ फळे मिळतात. पिवळी फुले आणून देवी सरस्वतीला अर्पण करा. पिवळ्या अन्नपदार्थ आणि पिवळे कपडे दान करणे देखील शुभ मानले जाते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
उद्या शुभ मुहूर्त असूनही लग्नाची इच्छा होणार नाही पूर्ण, 'हे' कारण वाचाच; अन्यथा संसारावर होऊ शकतो वाईट परिणाम
Next Article
advertisement
BMC Shiv Sena UBT: बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब्रँड शिलेदार
बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब
  • राजकीय संघर्षाचे केंद्र महापालिका सभागृहाकडे सरकले आहे.

  • ठाकरे गटाने विरोधी बाकावर बसण्याची तयारी केली असल्याचे चित्र आहे.

  • ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या गटनेते पदी आक्रमक चेहरा देण्यात आला आहे.

View All
advertisement