Ganesh Jayanti 2026: रवि योगात आज गणेश जयंती उत्सव; महाराष्ट्रात नेमकी कशी केली जाते पूजा-विधी
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Ganesh Jayanti 2026 Puja Vidhi Muhurat: माघ महिन्यातील गणेशजयंतीला धातूच्या, पाषाणाच्या किंवा मातीच्या गणेशमूर्तीची पूजा करावयाची असते. प्रथम प्राणप्रतिष्ठा करून मंत्रांनी मूर्तीमध्ये देवत्त्व आणले जाते. आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, यज्ञोपवीत , गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, मंत्रपुष्प, प्रदक्षिणा आणि..
मुंबई : माघ महिना सुरू झाला की गणेश भक्तांना माघी गणेशोत्सवाचे वेध लागतात. आज प्रतिक्षा संपली असून गणेश जयंती उत्सव सुरू होत आहे. माघ महिन्यातील या गणेश जयंतीच्या दिवशी करावयाचे गणेशपूजन भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीच्या गणेशपूजनासारखेच करावयाचे असते. याविषयी ज्येष्ठ पंचागकर्ते दा.कृ. सोमण यांनी दिलेली माहिती जाणून घेऊ.
गणेश जयंतीच्या दिवशी पाण्यात तीळ घालून त्या पाण्याने स्नान करावयाचे असते. तसेच उपवास करावयाचा असतो. भाद्रपदातील गणेश चतुर्थीच्या दिवशी ‘पार्थिव गणेश पूजन‘ करण्यास सांगितले आहे. त्यामुळे त्या गणेशपूजनातील गणेशमूर्ती ही मातीचीच असावी लागते. याला तसे कारणही आहे, कारण या दिवसात शेतात धान्य तयार होत असते, म्हणून पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ती एकप्रकारे पृथ्वीचीच पूजा असते. म्हणून मातीच्याच गणेशमूर्तीचे पूजन करावयाचे असते.
advertisement
माघ महिन्यातील गणेशजयंतीला धातूच्या, पाषाणाच्या किंवा मातीच्या गणेशमूर्तीची पूजा करावयाची असते. प्रथम प्राणप्रतिष्ठा करून मंत्रांनी मूर्तीमध्ये देवत्त्व आणले जाते. आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, यज्ञोपवीत , गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, मंत्रपुष्प, प्रदक्षिणा आणि नमस्कार या सोळा उपचारांनी पूजन करावयाचे असते. माघ महिन्यातील या गणेशपूजनात पत्री अर्पण न करता दूर्वा अर्पण करतात. तसेच पुरणाच्या मोदकांऐवजी तिळसाखरेच्या मोदकांचा प्रसाद अर्पण करावयाचा असतो. मूर्ती विसर्जनापूर्वी उत्तरपूजा करून देवत्त्व काढून घेतले जाते.
advertisement
एक गोष्ट मात्र खूप महत्त्वाची ती म्हणजे गणेशमूर्ती लहान असावी पण श्रद्धा भक्ती महान असावी. ईश्वराचे पूजन त्याचे गुण आपल्यात यावेत यासाठी करावयाचे असते. केवळ पूजनाने हे गुण आपल्या अंगी येत नाहीत तर त्यासाठी अथक परिश्रमांची जरूरी असते. तसेच मनोबलाची जरूरी असते. ईश्वरपूजा करूनही जर आपण आपल्यात चांगला बदल केला नाही तर पूजा व्यर्थ ठरते. तसेच उत्सव साजरा करीत असताना प्रदूषण होणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घ्यावयास हवी आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबरच उत्सव साजरे करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे जलप्रदूषण, वायूप्रदूषण आणि ध्वनीप्रदूषण होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावयास हवी आहे. माघी गणेशोत्सवाचा काळात विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू असतात. म्हणून या उत्सवाच्या काळात ध्वनीवर्धकाचा वापर संयमाने करावा.
advertisement
श्रीगणेशाने प्रत्येक अवतारात अनेक दुष्ट राक्षसांचा नाश केला, आपणही गणेश उपासना करून आपल्यातील आळस, अज्ञान, अंधश्रद्धा, अनीती, दुराचार, अस्वच्छता इत्यादी वाईट गोष्टींचा नाश करण्याचा प्रयत्न करायला हवा. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षड् रिपूंवर नियंत्रण ठेवण्याची आत्मशक्ती प्राप्त करून घ्यावयास हवी.
advertisement
गणेश जयंती मुहूर्त -
माघ शुक्ल चतुर्थी तिथी सुरू होते: गुरुवार, 22 जानेवारी, पहाटे 2:47 वाजता
माघ शुक्ल चतुर्थी तिथी समाप्त: शुक्रवार, 23 जानेवारी, पहाटे 2:28 वाजता
गणेश जयंती पूजा मुहूर्त: सकाळी 11:29 ते दुपारी 1:37 पर्यंत
रवि योग: आज सकाळी 07:14 ते दुपारी 02:27 पर्यंत
चंद्रोदयाची वेळ: सकाळी 09:22
चंद्रास्त वेळ: रात्री 09:19
advertisement
गणेश जयंती पूजा मंत्र
- ॐ गं गणपतये नमो नमः
- वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥
प्रपन्न जनपालाय प्रणतार्ति विनाशिने ॥
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 22, 2026 8:21 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Ganesh Jayanti 2026: रवि योगात आज गणेश जयंती उत्सव; महाराष्ट्रात नेमकी कशी केली जाते पूजा-विधी









