IPL 2025 मधून बाहेर पडताच अभिषेक शर्माच्या घरी लगीन घाई, Instagram वर दिली गुड न्यूज!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Abhishek Sharma Sister Roka : अभिषेकने स्वतः त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अभिषेकने इंस्टाग्रामवर कोमल शर्मा आणि लव्हिश ओबेरॉय यांच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे.
Abhishek Sharma Sister Komal Roka Ceremony : गेल्या वर्षीची रनरअप टीम सनरायझर्स हैदराबाद संघाला यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी करता आली नाही. सनरायझर्सला यंदा प्लेऑफमध्ये देखील जागा मिळवता आली नाही. सनरायझर्स हैदराबाद सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा याने एकट्याच्या जोरावर काही सामने फिरवले पण हैदराबाद सांघिक करण्यास फेल ठरली. अशातच आता आयपीएलमधून बाहेर पडताच पंजाबी मुंडा आणि युवा क्रिकेटपटू अभिषेक शर्माच्या घरी सध्या आनंदाचे वातावरण आहे. अभिषेक शर्माच्या घरी लवकरच सनई चौघडे वाजणार आहेत.
अभिषेक शर्माच्या घरी सनई चौघडे
अभिषेक शर्माची बहीण, कोमल शर्मा हिचा 'रोका' समारंभ नुकताच पार पडला आहे. अभिषेकने स्वतः त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अभिषेकने इंस्टाग्रामवर कोमल शर्मा आणि लव्हिश ओबेरॉय यांच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यावरून हा 'रोका' समारंभ झाल्याचे स्पष्ट होते. आपल्या बहिणीच्या या नव्या प्रवासाविषयी आनंद व्यक्त केला. तुमच्या दोघांचे अभिनंदन...अखेर हे घडलेच, याचा मला आनंद आहे, असं अभिषेकने पोस्टमध्ये लिहिलंय.
advertisement
लविश ओबेरॉय कोण?
अभिषेकची मोठी बहीण कोमल शर्मा ही व्यवसायाने एक पात्र फिजिओथेरपिस्ट आहे. लविश ओबेरॉय असं तिच्या होण्याऱ्या नवऱ्याचं नाव आहे. 'रोका' समारंभ हा विवाहपूर्व विधींचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. अभिषेकला सोनिया नावाची आणखी एक मोठी बहीण आहे. कोमल शर्माचा जन्म 20 मार्च 1994 रोजी अमृतसर, पंजाब येथे झाला होता. आपल्या लाडक्या भावासाठी कोमल अनेकदा हैदराबादच्या सामन्यांना देखील हजेरी लावताना दिसते.
advertisement
advertisement
दरम्यान, अभिषेक शर्माची आयपीएल 2025 मधील कामगिरी अत्यंत प्रभावी आणि लक्षवेधी राहिली आहे. सनरायझर्स हैदराबाद संघासाठी एक प्रमुख फलंदाज म्हणून त्याने या हंगामात १३ सामन्यांमध्ये एकूण ४४५ धावा केल्या आहेत. या धावा त्याने १९३.३९ च्या जबरदस्त स्ट्राइक रेटने बनवल्या, ज्यामुळे त्याची आक्रमक फलंदाजी स्पष्ट दिसून येते. या हंगामात त्याने एक दमदार शतक (पंजाब किंग्जविरुद्ध १४१ धावा) आणि दोन महत्त्वपूर्ण अर्धशतके झळकावली आहेत.
advertisement
विशेष म्हणजे, आयपीएलच्या इतिहासात दोन हंगामांमध्ये १९० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने ४०० हून अधिक धावा करणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला आहे, ज्यामुळे त्याची क्षमता आणि सातत्य अधोरेखित होते. सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये त्याला अपेक्षित यश मिळाले नसले तरी, हंगामाच्या उत्तरार्धात त्याने महत्त्वपूर्ण खेळी खेळून संघाला मोठे योगदान दिले. त्याने काही सामन्यांमध्ये गोलंदाजीही केली असली तरी, या हंगामात त्याला विकेट्स मिळवता आल्या नाहीत.
Location :
Punjab
First Published :
May 31, 2025 12:12 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2025 मधून बाहेर पडताच अभिषेक शर्माच्या घरी लगीन घाई, Instagram वर दिली गुड न्यूज!