advertisement

IND vs PAK : 'गंभीरने टीम इंडियामध्ये पॉलिटिक्स आणलं...', विराट कोहलीचा उल्लेख करत पाकिस्तानी खेळाडूने सोडल्या तोंडच्या वाफा!

Last Updated:

Ahmad Shehzad On Gautam Gambhir Politics : ज्या विराटबद्दल खुलेआम बोलत होते, गंभीरला संधी विराटविरुद्ध शडयंत्र रचण्याचा, असं अहमद शेहजाद म्हणाला.

Ahmad Shehzad Allegation On Gautam Gambhir
Ahmad Shehzad Allegation On Gautam Gambhir
Ahmad Shehzad On Gautam Gambhir : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया सुपर 8 मध्ये पोहोचली आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान देखील ग्रुप बी मधून सुपर 8 चे सामने खेळत आहे. अशातच आता पाकिस्तानच्या खेळाडूंनी टीम इंडियाला टार्गेट करण्यास सुरूवात केली आहे. साऊथ अफ्रिकेविरुद्ध भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला अन् पाकिस्तानला तोंड वर करून बोलण्याची इथेच संधी मिळालीये. पाकिस्तानचा माजी सलामीवीर फलंदाज अहमद शेहजाद याने गंभीरच्या राजकारणावर मोठं वक्तव्य केलंय.

गंभीरने टीम इंडियामध्ये राजकारण केलं

गौतम गंभीर राजकारणात होता. तिथं त्याला काहीही करता आलं नाही. पण गंभीरने तेच राजकारण टीम इंडियामध्ये उभं केलं. ज्या विराटबद्दल खुलेआम बोलत होते, त्यांना संधी विराटविरुद्ध शडयंत्र रचण्याचा, असं अहमद शेहजाद म्हणाला. यावेळी त्याने विराटच्या भावाचं उदाहरण देखील दिलं. विराट कोहलीच्या भावाने ट्विट केलं होतं. माझ्या भावासोबत असं असं झालंय पण नंतर ते ट्विट डिलिट करण्यात आलं. त्यामुळे गौतम गंभीरच्या पॉलिटिक्सने टीम इंडियाचा चेहरा खराब केलाय, असंही अहमद शेहजाद म्हणाला.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Prasenjit Adhikary (@cricxpranay)



advertisement

अहमद शहजाद काय म्हणाला?

एका पाकिस्तानी टीव्ही शोमध्ये साऊथ अफ्रिकेच्या पराभवानंतर गौतम गंभीर याच्याकडे बोट दाखवताना अहमद शहजाद म्हणाला की, जर प्लेइंग इलेव्हनमध्ये योग्य खेळाडूंची निवड झाली नाही, तर भारतीय संघ फेव्हरिट असूनही जेतेपदापासून दूर राहील. खराब फॉर्म असूनही अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा अजूनही प्लेइंग इलेव्हनमध्ये का आहेत? हे असे प्रश्न देखील त्याने यावेळी उपस्थित केले.
advertisement

पाकिस्तानी खेळाडूंवर टीका

दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं राजकारण कोणत्याही सिनेमापेक्षा कमी नाही. पाकिस्तानने आधी आपल्या देशाच्या क्रिकेटबद्दल विचार करावा, अशी टीका सोशल मीडियावरून पाकिस्तानी खेळाडूंवर होताना दिसतीये.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : 'गंभीरने टीम इंडियामध्ये पॉलिटिक्स आणलं...', विराट कोहलीचा उल्लेख करत पाकिस्तानी खेळाडूने सोडल्या तोंडच्या वाफा!
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement