Asia Cup च्या पहिल्याच सामन्यात गंभीर बॉम्ब फोडणार, बुमराहला ड्रॉप करणार! टीम इंडियाची शॉकिंग Playing XI

Last Updated:

मंगळवार 9 सप्टेंबरपासून आशिया कपला सुरूवात होणार आहे. भारताचा पहिला सामना युएईविरुद्ध 10 सप्टेंबरला होईल.

Asia Cup च्या पहिल्याच सामन्यात गंभीर बॉम्ब फोडणार, बुमराहला ड्रॉप करणार! टीम इंडियाची शॉकिंग Playing XI
Asia Cup च्या पहिल्याच सामन्यात गंभीर बॉम्ब फोडणार, बुमराहला ड्रॉप करणार! टीम इंडियाची शॉकिंग Playing XI
मुंबई : मंगळवार 9 सप्टेंबरपासून आशिया कपला सुरूवात होणार आहे. भारताचा पहिला सामना युएईविरुद्ध 10 सप्टेंबरला होईल. युएईविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियामध्ये काही धक्कादायक बदल अपेक्षित असल्याचं वृत्त समोर येत आहे. माध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तांनुसार टीम मॅनेजमेंट खासकरून मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर बुमराहला पहिल्या सामन्यातून ड्रॉप करण्याच्या विचारात आहे. हा निर्णय टीम इंडियाच्या रणनीतीच भाग असल्याचं मानलं जातंय.
गौतम गंभीरचा हा निर्णय फक्त एका खेळाडूला बाहेर करण्याचा नाही तर टीमच्या बॉलिंग लाईनअपमध्ये नवीन संतुलन आणण्याचा प्रयत्न आहे. पण गंभीरचा हा निर्णय टीम इंडियाला फायदा करून देईल, का त्याचा उलटा परिणाम होईल? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. बुमराहची जागा घेणारा बॉलर त्याच्यासारखी कामगिरी करू शकेल का? याबाबतही साशंकता आहे.
advertisement

गंभीरच्या प्लानमधून बुमराह गायब?

बुमराहचं नाव टीम इंडियाच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये दिसलं नाही, तर साहजिकच क्रिकेट चाहते आणि तज्ज्ञ हैराण होऊ शकतात, कारण बुमराह टीम इंडियाच्या बॉलिंगचा महत्त्वाचा भाग आहे, पण आशिया कपसाठी गंभीरचा प्लान वेगळा असल्याचं सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार युएईविरुद्धच्या सामन्यात टीम इंडिया स्पिन बॉलिंग आक्रमणासह खेळण्याची शक्यता आहे. दुबईमधली खेळपट्टी धीमी आणि स्पिन बॉलरना मदत करणारी असते, त्यामुळे गंभीर फास्ट बॉलरऐवजी तीन स्पिनर आणि एक ऑलराऊंडर घेऊन खेळण्याचा विचार करत आहे.
advertisement
गंभीर एक फास्ट बॉलर, एक ऑलराऊंडर आणि तीन स्पिनर घेऊन खेळणार असेल, तर अर्शदीप हा टी-20 क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. अर्शदीपसोबत हार्दिक सुरूवातीला बॉलिंग करू शकतो, त्यानंतर कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल हे तीन स्पिनर बॉलिंग करतील.
गौतम गंभीर याचे कोच राहिलेले संजय भारद्वाज यांनीही न्यूज 18 सोबत बोलताना गंभीर 8 बॅटर आणि 3 टेलएंडर्ससोबत मैदानात उतरू शकतो, अशी प्रतिक्रिया दिली आहे. आयपीएलमध्येही याच फॉर्म्युलामुळे गंभीरला यश मिळाल्याचं संजय भारद्वाज म्हणाले आहेत.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asia Cup च्या पहिल्याच सामन्यात गंभीर बॉम्ब फोडणार, बुमराहला ड्रॉप करणार! टीम इंडियाची शॉकिंग Playing XI
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement