Asia Cup : 0,0,0... लागोपाठ तिसऱ्यांदा बदक, पाकिस्तानचा स्टार बॅट्समन तोंड लपवून पळाला
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आशिया कपमध्ये पाकिस्तानी बॅटिंगची निराशाजनक कामगिरी काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. युएईविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचे दोन्ही ओपनर पुन्हा एकदा अपयशी ठरले.
दुबई : आशिया कपमध्ये पाकिस्तानी बॅटिंगची निराशाजनक कामगिरी काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. युएईविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचे दोन्ही ओपनर पुन्हा एकदा अपयशी ठरले. सॅम अयुब शून्य रनवर तर साहिबजादा फरहान 5 रनवर आऊट झाला. सॅम अयुब लागोपाठ तिसऱ्यांदा शून्यवर आऊट झाला आहे. याआधी ओमान आणि भारताविरुद्धच्या सामन्यातही सॅम अयुब शून्य रनवर माघारी परतला होता.
ओमान आणि भारताविरुद्ध सॅम अयुब पहिल्याच बॉलला तर युएईविरुद्ध मॅचच्या दुसऱ्या बॉलला आऊट झाला. मागच्या 6 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सॅम अयुब चौथ्यांदा शून्य रनवर आऊट झाला आहे. तसंच पाकिस्तानकडून टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा शून्य रनवर आऊट होणाऱ्या खेळाडूंमध्ये सॅम अयुब तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. सॅम अयुब 44 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 8 वेळा शून्यवर आऊट झाला. तर शाहिद आफ्रिदीही 90 टी-20 सामन्यांमध्ये 8 वेळाच शून्य रनवर माघारी परतला. पाकिस्तानकडून टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक वेळा शून्यवर आऊट व्हायचा विक्रम उमर अकमलच्या नावावर आहे. उमर अकमल 79 इनिंगमध्ये 10 वेळा शून्यवर आऊट झाला.
advertisement
बुमराहला सहा सिक्स मारण्याची भाषा
काहीच दिवसांपूर्वी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू तनवीर अहमद याने सॅम अयुबबाबत मोठे दावे केले होते. सॅम अयुब भारताविरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराहला 6 बॉल 6 सिक्स मारेल, असं तनवीर अहमद म्हणाला होता, पण याच सॅम अयुबला आता एक रन करणंही कठीण झालं आहे.
पाकिस्तानसाठी करो या मरो
advertisement
आशिया कपमध्ये युएईविरुद्धचा हा सामना पाकिस्तानसाठी करो या मरो आहे. या सामन्यात पराभव झाला, तर पाकिस्तानचं आशिया कपमधील आव्हान संपुष्टात येईल. तसंच युएई भारतासोबत सुपर-4 मध्ये प्रवेश करणारी दुसरी टीम ठरेल. पण हा सामना पाकिस्तानने जिंकला तर भारत आणि पाकिस्तान सुपर-4 मध्ये प्रवेश करतील. भारत-पाकिस्तान सुपर-4 मध्ये गेले तर या दोन्ही टीममध्ये रविवार 21 सप्टेंबरला पुन्हा एकदा सामना होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 17, 2025 9:53 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asia Cup : 0,0,0... लागोपाठ तिसऱ्यांदा बदक, पाकिस्तानचा स्टार बॅट्समन तोंड लपवून पळाला