मीनाताईंच्या पुतळ्यावर ठाकरेंच्या कार्यकर्त्याच्या भावानेच रंग फेकला, पोलिसांकडे धक्कादायक कबुली

Last Updated:

संपत्तीच्या वादात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करत रागातून हे कृत्य केल्याची धक्कादायक कबुली दिली आहे.

News18
News18
मुंबई : बाळासाहेबांच्या पत्नी मिनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर काही अज्ञातांनी रंग उडवल्यामुळे खळबळ माजली. मीनाताईंचा हा पुतळा मुंबईच्या अत्यंत वर्दळीच्या असलेल्या शिवाजी पार्क भागात आहे. मीनाताई ठाकरे प्रत्येक शिवसैनिकाला आदरस्थानी असल्याने या घटनेमुळे काही काळ तणावही निर्माण झाला. या घटनेनंतर दोन्ही ठाकरे बंधुंनी पुतळ्याची पाहणीसुद्धा केली. त्यानंतर कृ्त्य करणाऱ्या खोडसाळ व्यक्तीचा शोध सुरू झाला. अखेर 12 तासानंतर अटक करण्यात आला असून आरोपी उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ असलयाची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही माहिती विश्वसनीय सूत्रांची न्यूज १८ लोकमतला दिली आहे.
मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ असल्याचे समोर आले आहे. उपेंद्र गुणाजी पावसकर असे आरोपीचे नाव असून गुन्हा केल्याचे त्याने कबूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या जबाबात आरोपींने दिली धक्कादायक माहिती दिली आहे.

संपत्तीच्या वादातून केली रंगफेक

संपत्तीच्या वादात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करत रागात आरोपीने हे धक्कादायक कृत्य केल्याची कबुली दिली आहे. दादर पोलिस ठाण्यात श्रीधर पावसकर आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी सातत्याने यायचा, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. जबाब नोंदवल्यानंतर पोलिस अधिक तपास करत आहेत.
advertisement

काय आहे प्रकरण? 

सकाळच्या सुमारास मीनाताई ठाकरेंच्या अर्धाकृती पुतळ्यावर अज्ञाताने लाल रंग फेकल्याची घटना समोर आणि शिवसैनिकांनी पुतळ्याजवळ धाव घेतली. शिवसैनिकांनी तात्काळ या परिसराची साफसफाई केली. पण त्याचसोबत या घटनेवरुन संतप्त प्रतिक्रियाही उमटल्या. या घटनेची माहिती मिळताच राज आणि उद्धव या ठाकरे बंधूंनी स्मृती स्थळावर येत पाहणी केली. तसेच या प्रकारे मागे षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त केला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मीनाताईंच्या पुतळ्यावर ठाकरेंच्या कार्यकर्त्याच्या भावानेच रंग फेकला, पोलिसांकडे धक्कादायक कबुली
Next Article
advertisement
Eknath Shinde Ambernath Nagar Parishad Result: अंबरनाथमध्ये शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? समोर आली १० कारणे....
शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं
  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

View All
advertisement