IND vs PAK : आशिया कप फायनलच्या टॉसवेळी हाय व्होल्टेज ड्रामा, पाकिस्तानने मैदानात केला नको तो प्रकार, वकारनेही दिली साथ

Last Updated:

भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या आशिया कप फायनलच्या टॉसवेळीही हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.

आशिया कप फायनलच्या टॉसवेळी हाय व्होल्टेज ड्रामा, पाकिस्तानने मैदानात केला नको तो प्रकार, वकारनेही दिली साथ
आशिया कप फायनलच्या टॉसवेळी हाय व्होल्टेज ड्रामा, पाकिस्तानने मैदानात केला नको तो प्रकार, वकारनेही दिली साथ
दुबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या आशिया कप फायनलच्या टॉसवेळीही हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा या दोघांसोबत दोन ब्रॉडकास्टर टॉससाठी मैदानात आले. टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सूर्यकुमार यादवची मुलाखत घेतली. तर पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर वकार युनूसने सलमान आघाला प्रश्न विचारले. आशिया कपमध्ये पहिल्यांदाच दोन ब्रॉडकास्टर टॉसवेळी मैदानात उपस्थित होते.
याआधी भारत-पाकिस्तान यांच्यातल्या ग्रुप स्टेज आणि सुपर-4 सामन्यावेळी एकाच ब्रॉडकास्टरने दोन्ही कर्णधारांना प्रश्न विचारले होते, पण मागच्या दोन सामन्यांनंतर भारत-पाकिस्तानच्या टीममधला तणाव वाढला होता. आशिया कपच्या फायनलआधी पीसीबी आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रमुख मोहसिन नक्वी यांनी उचकवणारी वक्तव्य केली होती. 'भारताविरुद्ध तुम्हाला जे करायचं आहे ते करा, मी सांभाळून घेईन', असं नक्वी म्हणाले. यानंतर आशिया कपच्या फायनलमध्ये टॉसवेळी वाद निर्माण झाला. रवी शास्त्रींना उत्तर द्यायचं नाही म्हणून पाकिस्तानने वकार युनूसला प्रश्न विचारण्यासाठी बोलावलं.
advertisement
आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान वाद
आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यातल्या पहिल्या सामन्यापासून वाद पाहायला मिळाले. 14 सप्टेंबरला झालेल्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन केलं नाही. याचा निषेध म्हणून पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा मॅच संपल्यानंतरच्या सोहळ्याला आणि पत्रकार परिषदेला उपस्थित राहिला नाही. तसंच सुपर-4 मधल्या सामन्यानंतर सलमान आघाने भारतीय पत्रकारांना प्रश्न विचारायला मनाई केली. तर पीसीबीचे प्रमुख मोहसिन नक्वी यांनीही टाळाटाळ करणारी उत्तरं दिली.
advertisement
दुसरीकडे भारतीय खेळाडूंनाी मात्र कठीण प्रश्नांनाही उघडपणे तोंड दिलं. हस्तांदोलन वादावेळी सूर्यकुमार यादवने आत्मविश्वासाने उत्तर देऊन मनं जिंकली, पण फायनलमध्ये पाकिस्तानने दोन ब्रॉडकास्टर मैदानात उतरवून पुन्हा एकदा रडारड केली.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : आशिया कप फायनलच्या टॉसवेळी हाय व्होल्टेज ड्रामा, पाकिस्तानने मैदानात केला नको तो प्रकार, वकारनेही दिली साथ
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement