IND vs PAK : टीम इंडियाला मोठा झटका, फायनलमधून हार्दिक बाहेर, Playing XI मध्ये 2 बदल

Last Updated:

IND vs PAK Asia Cup Final भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कपची फायनल होत आहे. आशिया कपच्या 41 वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच भारत-पाकिस्तानच्या टीम फायनलमध्ये आमनेसामने आल्या आहेत.

टीम इंडियाला मोठा झटका, फायनलमधून हार्दिक बाहेर, Playing XI मध्ये 2 बदल
टीम इंडियाला मोठा झटका, फायनलमधून हार्दिक बाहेर, Playing XI मध्ये 2 बदल
दुबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या आशिया कपच्या फायनलमध्ये भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. या सामन्यामध्ये टीम इंडियाला मोठा धक्का लागला आहे. हार्दिक पांड्या दुखापतीमुळे या सामन्यात खेळत नाहीये. हार्दिक पांड्याला श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यामध्येच दुखापत झाली होती. शिवम दुबे आणि रिंकू सिंग याचं टीम इंडियात कमबॅक झालं आहे, तर हर्षीत राणा आणि अर्शदीप सिंगला बाहेर बसावं लागलं आहे. आशिया कपच्या 41 वर्षांच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान यांच्यात पहिल्यांदाच फायनल सामना होत आहे.

भारताची प्लेयिंग इलेव्हन

अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती

पाकिस्तानची प्लेयिंग इलेव्हन

साहिबजादा फरहान, फखर जमान, सॅम अयुब, सलमान आगा (कर्णधार), हुसैन तलत, मोहम्मद हरिस (विकेटकीपर), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हरिस राऊफ, अबरार अहमद
advertisement

भारताचं रेकॉर्ड

आशिया कपच्या या मोसमात टीम इंडियाने एकही सामना गमावलेला नाही. ग्रुप स्टेजमध्ये युएईविरुद्धच्या सामन्यात भारताचा 9 विकेटने विजय झाला. तर पाकिस्तानविरुद्ध 7 विकेटने आणि ओमानविरुद्ध 21 रनने भारताने सामना जिंकला. यानंतर सुपर-4 स्टेजमध्ये भारताने बांगलादेशला 41 रननी आणि पाकिस्तानला 6 विकेटने पराभूत केलं. तर श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा सुपर ओव्हरमध्ये विजय झाला.
advertisement

पाकिस्तानचं रेकॉर्ड

दुसरीकडे पाकिस्तानने या आशिया कपमध्ये जे दोन्ही सामने गमावले ते भारताविरुद्धचेच होते. ग्रुप स्टेजमध्ये ओमानविरुद्ध पाकिस्तानचा 93 रननी विजय झाला, तर भारताविरुद्धचा सामना त्यांनी 7 विकेटने गमावला. यानंतर युएईविरुद्ध पाकिस्तानचा 41 रननी विजय झाला. सुपर-4 स्टेजच्या पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानला 6 विकेटने धूळ चारली. यानंतर श्रीलंकेविरुद्ध पाकिस्तानचा 5 विकेटने आणि श्रीलंकेविरुद्ध 11 रननी विजय झाला.
advertisement

फायनलमध्ये टीम इंडियाची खराब कामगिरी

आधीचं रेकॉर्ड पाहिलं तर फायनलमध्ये टीम इंडियाचं पाकिस्तानविरुद्धचं रेकॉर्ड निराशाजनक राहिलं आहे. भारत आणि पाकिस्तान आतापर्यंत 12 वेळा वेगवेगळ्या स्पर्धांच्या फायनलमध्ये खेळल्या आहेत, ज्यात पाकिस्तानचा 8 फायनलमध्ये आणि भारताचा 4 फायनलमध्ये विजय झाला आहे. यातला पाकिस्तानचा शेवटचा विजय 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आला आहे, ज्यात त्यांनी टीम इंडियाचा 180 रननी पराभव केला आहे.
advertisement
दुसरीकडे मागच्या भारत-पाकिस्तान यांच्यातल्या मागच्या 15 टी-20 सामन्यांमध्ये भारताचा 12 सामन्यांमध्ये तर पाकिस्तानचा फक्त 3 सामन्यांमध्ये विजय झाला आहे. भारताची पाकिस्तानविरुद्धची विजयी टक्केवारी 80 टक्के आहे.

आशिया कपमध्ये कोण कुणावर भारी?

आशिया कप 1984 मध्ये सुरू झाला आणि तेव्हापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये 15 वनडे सामने खेळले गेले आहेत. भारताने यापैकी 8 सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानने 5 वेळा विजय मिळवला. यापैकी दोन सामने अनिर्णित राहिले आहेत किंवा निकाल लागला नाही. एकूणच, आशिया कप वनडे सामन्यांमध्ये भारताचा पाकिस्तानविरुद्धचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे.
advertisement

भारताचे पाकिस्तानवर वर्चस्व

वनडे आणि टी-20 दोन्ही सामने एकत्र केले तर, आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 20 सामने झाले आहेत. यापैकी 12 सामने भारताने जिंकले, तर फक्त 6 सामने पाकिस्तानने जिंकले, त्यापैकी दोन सामने अनिर्णित राहिले किंवा निकालाविना संपले, त्यामुळे आशिया कपमध्ये पाकिस्तानवर भारताचं कायमच वर्चस्व राहिल्याचं ही आकडेवारी सिद्ध करते.
advertisement

टी-20 आशिया कपमध्ये कोण पुढे?

वनडे व्यतिरिक्त भारत-पाकिस्तानच्या टीम टी-20 आशिया कपमध्ये 5 वेळा आमनेसामने आल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये भारताचे वर्चस्व अधिक स्पष्ट आहे. 5 सामन्यांपैकी 4 सामन्यांमध्ये भारताचा विजय झाला तर पाकिस्तानने फक्त एकच मॅच जिंकली आहे.
आशिया कपमध्ये भारताचे टॉप-7 बॅटर हे प्रत्येक 5 बॉलनंतर एक बाऊंड्री मारत आहेत, तर दुसरीकडे पाकिस्तानच्या टॉप-7 बॅटरना एक बाऊंड्री मारण्यासाठी 8 बॉल लागत आहेत.

कशी असणार खेळपट्टी?

भारत-पाकिस्तान यांच्यातल्या फायनलसाठी दुबईच्या मैदानात दोन खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या आहेत. यातली एक खेळपट्टी याआधीच्या भारत-पाकिस्तान सामन्यासाठी वापरण्यात आली होती, तर दुसरी खेळपट्टी ही ताजी आहे. या खेळपट्टीवर भारत-श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यासारख्या जास्त रन होऊ शकतात.

टॉसच ठरणार बॉस?

दुबईच्या खेळपट्टीवर मागच्या 10 सामन्यांमध्ये टॉसची भूमिका फार महत्त्वाची राहिलेली नाही. कारण या 10 पैकी 5 सामने पहिले बॅटिंग करणाऱ्या तर 5 सामने नंतर बॅटिंग करणाऱ्या टीमने जिंकल्या आहेत. दुबईच्या मैदानामध्ये पहिल्या इनिंगचा सरासरी स्कोअर हा 148 रन एवढा आहे.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : टीम इंडियाला मोठा झटका, फायनलमधून हार्दिक बाहेर, Playing XI मध्ये 2 बदल
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement