Joe Root : सचिन तेंडुलकरचं वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात, जो रूट इतिहास घडवण्यापासून फक्त एक पाऊल दूर

Last Updated:

इंग्लंडचा क्रिकेटपटू जो रूट हा सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे.

सचिन तेंडुलकरचं वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात, जो रूट इतिहास घडवण्यापासून फक्त एक पाऊल दूर
सचिन तेंडुलकरचं वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात, जो रूट इतिहास घडवण्यापासून फक्त एक पाऊल दूर
सिडनी : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातल्या ऍशेस 2025-26 चा पाचवा आणि शेवटचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुरू झाला आहे. या सामन्यात इंग्लंडने पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर जो रूटने पहिल्याच दिवशी अर्धशतक ठोकलं. जो रूटचं टेस्ट क्रिकेटमधलं हे 67 वं अर्धशतक होतं. याचसोबत रूट सचिन तेंडुलकरच्या वर्ल्ड रेकॉर्डच्या आणखी जवळ पोहोचला आहे. आणखी एक अर्धशतक करताच रूट सचिनच्या विक्रमासोबत बरोबरी करेल. सचिन तेंडुलकरच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये 68 अर्धशतकं आहेत.
सिडनीमध्ये अर्धशतक करताच रूटने वेस्ट इंडिजच्या शिवनारायण चंद्रपॉलला मागे टाकलं. चंद्रपॉलने टेस्ट क्रिकेटमध्ये 66 अर्धशतकं ठोकली होती. सचिन तेंडुलकरच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन, सर्वाधिक शतकं आणि सर्वाधिक अर्धशतकं आणि सर्वाधिक मॅच खेळण्याचा विक्रम आहे, पण आता सचिनचा सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रम धोक्यात आला आहे.

टेस्टमध्ये सर्वाधिक अर्धशतकं

सचिन तेंडुलकर- 68 अर्धशतकं
advertisement
जो रूट- 67 अर्धशतकं
शिवनारायण चंद्रपॉल- 66 अर्धशतकं
राहुल द्रविड- 63 अर्धशतकं
ऍलन बॉर्डर- 63 अर्धशतकं
रिकी पॉन्टिंग- 62 अर्धशतकं
सचिन तेंडुलकरने टेस्ट क्रिकेटमध्ये 119 वेळा 50+ स्कोअर केले आहेत, या रेकॉर्डमध्येही रूट सचिनच्या जवळ पोहोचला आहे. जो रूटने टेस्ट क्रिकेटमध्ये 107 वेळा 50+ स्कोअर केला आहे. रूटच्या बॅटने सातत्याने रन येत असल्यामुळे तो सचिनचा हा विक्रमही मोडण्याची शक्यता आहे.
advertisement

टेस्टमध्ये सर्वाधिक 50+ स्कोअर

सचिन तेंडुलकर- 119
जो रूट- 107
जॅक कॅलिस- 103
रिकी पॉन्टिंग- 103
राहुल द्रविड- 99

ब्रुक-रूटने इंग्लंडला सावरलं

पहिले बॅटिंग करताना इंग्लंडची सुरूवात खराब झाली. 13 ओव्हरमध्येच इंग्लंडने 57 रनवर 3 विकेट गमावल्या होत्या, यानंतर रूट आणि ब्रुकने इंग्लंडला सावरलं. चौथ्या विकेटसाठी दोघांमध्ये 150 रनची नाबाद पार्टनरशीप झाली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडचा स्कोअर 211/3 एवढा झाला आहे. दोघांमध्ये 192 बॉलमध्ये 154 रनची पार्टनरशीप झाली. हॅरी ब्रुक 78 रनवर नाबाद आणि रूट 72 रनवर नाबाद आहेत.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Joe Root : सचिन तेंडुलकरचं वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात, जो रूट इतिहास घडवण्यापासून फक्त एक पाऊल दूर
Next Article
advertisement
US Attack Venezuela Gold Price: अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला, सोनं-चांदीच्या दराचं काय होणार? एक्सपर्टच्या अंदाजाने गुंतवणूकदारांची झोप उडणार!
अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला, सोनं-चांदीच्या दराचं काय होणार? एक्सपर्टच्या अंदा
  • अमेरिकेने व्हेनेझुएला देशावर हल्ला करत राष्ट्रपती मादुरो यांना अटक केली.

  • व्हेनेझुएला हा देश सर्वाधिक तेल उत्पादन करणाऱ्या देशांपैकी एक

  • अमेरिकेच्या हल्ल्याचे परिणाम बाजारावरही होणार असल्याचे संकेत

View All
advertisement