IPL 2026 : बांग्लादेश सरकार अखेर गुडघ्यावर! आयपीएलबाबत घेतला यु-टर्न; 24 तासाच्या आत मोठा निर्णय
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Bangladesh lifts the ban on IPL Telecast : बांगलादेश सरकारच्या या निर्णयामुळे भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांमधील क्रिकेट संबंधांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Bangladesh lifts the ban on IPL Telecast : बीसीसीआयसाठी सोन्याची खाण असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या 19 व्या सीजनचा थरार आजपासून सुरू होत आहे. पहिल्याच मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने येतील. ही मॅच सुरू होण्यासाठी काही तास उरले असतानाच, बांगलादेश सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. बांगलादेशने आयपीएलच्या प्रक्षेपणाबाबत घेतलेला आपला जुना निर्णय बदलला असून प्रक्षेपणावरील बंदी उठवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
बांगलादेशने यु-टर्न घेतलाय
बांगलादेशचा स्टार बॉलर मुस्तफिजुर रहमानला हिंदूंवरील होणाऱ्या अत्याचारामुळे आयपीएलमधून बाहेर केल्यानंतर बांगलादेशच्या मागील सरकारने आयपीएलच्या लाईव्ह प्रक्षेपणावर देशात बंदी घातली होती. मात्र, नवनियुक्त माहिती आणि प्रसारण मंत्री जाहिद उद्दीन स्वपन यांनी शनिवारी या बंदीला केराची टोपली दाखवली. पण याचा फटका बांगलादेशला बसल्याचं लक्षात घेता बांगलादेशने यु-टर्न घेतलाय.
advertisement
देशांमधील संबंधांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता
प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील मागील सरकारने हा निर्णय घेतला होता, ज्यामुळे स्थानिक चॅनेल आणि ऑपरेटर्सना ही लोकप्रिय टी-20 लीग दाखवता येत नव्हती. बांगलादेश सरकारच्या या निर्णयामुळे भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांमधील क्रिकेट संबंधांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
advertisement
...तर आम्ही परवानगी देऊ - मंत्री जाहिद उद्दीन
जर एखाद्या चॅनेलने आयपीएल दाखवण्यासाठी परवानगी मागितली, तर आम्ही त्यावर सकारात्मक विचार करू आणि त्यांना पूर्ण सहकार्य करू, असं सूचना आणि प्रसारण मंत्री जाहिद उद्दीन यांनी म्हटलं आहे. जर स्टार स्पोर्ट्सला प्रक्षेपण करायचे असेल तर ते करू शकतात. तसेच आमच्या देशातील कोणत्याही स्थानिक चॅनेलने यासाठी पुढाकार घेतला, तर आम्ही त्याला परवानगी देऊ, पण आम्ही कोणावरही सक्ती करणार नाही, असंही ते यावेळी म्हणाले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 28, 2026 2:18 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : बांग्लादेश सरकार अखेर गुडघ्यावर! आयपीएलबाबत घेतला यु-टर्न; 24 तासाच्या आत मोठा निर्णय






