advertisement

PM च्या पोरीशी पंगा, म्हणाला 'लॉर्ड्सची राणी...', मराठी बोलणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूला PCB ने थेट धाडली नोटीस!

Last Updated:

PCB issues show cause notice to Naseem Shah : नसीम शाहने तातडीने स्पष्टीकरण देताना सांगितले की, त्याचे सोशल मीडिया अकाउंट हॅक झाले होते आणि ती पोस्ट त्याने केलेली नव्हती. मात्र, पीसीबीने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

PCB issues show cause notice to Naseem Shah
PCB issues show cause notice to Naseem Shah
PCB Action Against Naseem Shah : दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानमधील लाहोरच्या गडाफी स्टेडियमवर पीएसएलचा उद्घाटन सोहळा आणि पहिली मॅच पार पडली. याच दरम्यान नसीम शाहच्या X (ट्विटर) हँडलवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. या पोस्टमध्ये पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांना मिळालेल्या 'व्हीआयपी ट्रीटमेंट'वर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. नसीम शाहच्या पोस्टची क्रिडाविश्वात खूप चर्चा झाली. त्यानंतर आता पीसीबीने मोठी कारवाई केलीये.

लॉर्ड्सच्या राणीसारखी वागणूक का?

"मरियम नवाज यांना लॉर्ड्सच्या राणीसारखी वागणूक का दिली जात आहे?" असा मजकूर त्या पोस्टमध्ये होता. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठा राजकीय गदारोळ निर्माण झाला. त्यानंतर ही पोस्ट डिलिट देखील करण्यात आली होती. अशातच आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नसीम शहावर कडक अॅक्शन घेतली आहे.
advertisement

अधिकृत नोटीस पाठवून उत्तर मागितलं

यावर नसीम शाहने तातडीने स्पष्टीकरण देताना सांगितले की, त्याचे सोशल मीडिया अकाउंट हॅक झाले होते आणि ती पोस्ट त्याने केलेली नव्हती. मात्र, पीसीबीने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, नसीम शाहच्या स्पष्टीकरणावर समाधान न मानता त्याला अधिकृत नोटीस पाठवून उत्तर मागितले आहे.
advertisement

प्रकरणाची सखोल समीक्षा केली जाईल - पीसीबी

पीसीबीने आपल्या अधिकृत स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे की, नसीम शाहला ठराविक मुदतीत या नोटिशीला उत्तर द्यावं लागेल. बोर्डाने स्पष्ट केलं की, खेळाडूंनी प्रोफेशनल स्टॅडर्ड्स, करारातील अटी आणि खेळाची प्रतिष्ठा राखणं बंधनकारक आहे. बोर्डाने नेमक्या कोणत्या कलमाचे उल्लंघन झालं हे सांगितले नसलं तरी, नसीमच्या उत्तरानंतर या प्रकरणाची सखोल समीक्षा केली जाईल, असं पहायला मिळतंय.
advertisement

अंतिम शिस्तभंगाची कारवाई

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाब शरीफ यांची कन्या आणि विद्यमान पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भाची नवाज, अनेक गाड्यांचा समावेश असलेल्या सुरक्षा ताफ्यासह कार्यक्रमस्थळी दाखल होताना दिसल्या. त्यानंतर नसीम शाहच्या पोस्टनंतर मोठा राडा झाल्याचं पहायला मिळालं. नसीमने प्रतिसाद दिल्यानंतर अंतिम शिस्तभंगाची कारवाई निश्चित केली जाईल, असं पीसीबीने म्हटलं आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
PM च्या पोरीशी पंगा, म्हणाला 'लॉर्ड्सची राणी...', मराठी बोलणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूला PCB ने थेट धाडली नोटीस!
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement