Naseem Shah Marathi : 'चहा प्यायला चला...', पाकिस्तानी क्रिकेटरच्या Video ने इंटरनेटवर धुमाकूळ, नसीम शहा मराठी कसा शिकला?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Naseem Shah Marathi Video : सध्या इंटरनेटवर पाकिस्तानी बॉलर नसीम शहा याचा व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यात तो मराठीत बोलताना दिसतोय.
Naseem Shah learn to speak Marathi : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कटुता कुठेही लपून राहिलेली नाही. आशिया कपमध्ये दोन्ही संघांनी हँडशेक देखील केला नव्हता. अशातच आता दोन्ही टीममध्ये संबंध ताणले गेले असताना पाकिस्तानी खेळाडूचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये तो अस्खलित मराठी बोलताना दिसतोय. हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून पाकिस्तानचा युवा बॉलर नसीम शहा आहे.
नसीम शहा अस्खलित मराठीमध्ये बोलताना
पाकिस्तानी क्रिकेटर सध्या ILT20 लीगमध्ये खेळत आहे. त्याला तिथं एक मराठी सहकारी भेटला. त्याकडून नसीम शहा याने मराठी शिकून घेतली. एका व्हायरल व्हिडीओमध्ये नसीम शहा मराठीमध्ये बोलताना दिसला. चहा पेयला चला, म्हणत तो सहकाऱ्यासोबत चहा पेयला गेला. तिथं गेल्यावर त्यावर देखील त्याने मराठी सोडली नाही. आता मला बरं वाटतंय, असं नसीम शहा म्हणाला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाना दिसतोय. पाकिस्तानी खेळाडूंचे अकाऊंट भारतीयांसाठी बॅन असले तरी सोशल मीडियावरून व्हिडीओ ट्रेंडिग होतोय.
advertisement
Watch naseem shah speak marathi language pic.twitter.com/yybBC6e1GG
— Anuj (@AnujKaReview) December 5, 2025
इंटरनॅशनल लीगमध्ये जगभरातून लोक येत असतात. कुणी पाकिस्तनमधून येतं तर कुणी इंडियामधून येतं.. तर कुणी ऑस्ट्रेलियातून येतं. क्रिकेट एक असा खेळ आहे तिथं सर्वजण एकत्र येतात. आता आम्हाला इथं एक महिना सोबत रहायचंय म्हटल्यावर नक्कीच आम्ही त्यांच्याकडून काही ना काही शिकतो आणि ते आमच्याकडून काही ना काही शिकत असतात, असं नसीम शहा मिळाला.
advertisement
Naseem Shah with a Marathi flavour? Here’s the reason behind it. #Pakistan #Marathi #ILT20 pic.twitter.com/x8m2GAvFmf
— Mr. Cricket UAE (@mrcricketuae) December 8, 2025
दरम्यान, क्रिकेटची ही चांगली गोष्ट आहे की, सामना जेव्हा खोलातच जातो तेव्हा प्रेक्षकांना देखील आनंद मिळतो आणि खेळाडूंना देखील शिकायला मिळतं. त्यामुळे क्रिकेटच्या क्वालिटीसाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, असंही नसीम शहा म्हणाला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 10, 2025 12:05 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Naseem Shah Marathi : 'चहा प्यायला चला...', पाकिस्तानी क्रिकेटरच्या Video ने इंटरनेटवर धुमाकूळ, नसीम शहा मराठी कसा शिकला?










