advertisement

Interesting Facts : कॉम्प्युटर, लॅपटॉप Refresh केल्यावर नेमकं काय होतं?

Last Updated:
अनेकांना वाटतं रिफ्रेश केल्याने सिस्टिमचा वेग वाढतो, RAM साफ होते पण तसं नाही. प्रत्यक्षात वेगळंच घडतं. 
1/7
लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर ऑन केला की बहुतेक लोक सगळ्यात आधी रिफ्रेश करतात. स्कटॉपवर राइट क्लिक केल्यावर दिसणारा रिफ्रेश किंवा फक्त F5 दाबल्यावर होणारी क्रिया अनेकांच्या सवयीची झाली आहे. स्पीड वाढतो, रॅम साफ होते असं अनेकांना वाटते. पण नेमका या रिफ्रेशचा खरा अर्थ काय? खरंच याने स्पीड वाढतो का, रॅम साफ होते का? तर नाही. मग रिफ्रेश केलं की नेमकं काय होतं? रिफ्रेश हा ऑप्शन कधी वापरायचा?

2/7
प्रत्यक्षात हा केवळ स्क्रीन अपडेट आहे. रॅम मध्ये चालणारे एप्स, प्रोग्राम, सर्व्हिस तशाच चालू राहतात. स्पीड वाढत नाही. प्रोसेस, रॅम, डिस्क यांच्यावर रिफ्रेशचा काहीही परिणाम होत नाही. बॅकग्राऊंड अॅप्स बंद होत नाहीत. रिफ्रेश केलं तरी विंडोजचे प्रोसेस, एप्लिकेशन, ब्राऊझऱ टॅब काहीच बंद होत नाही. त्यांची कार्यक्षमता तशीच राहते. रिफ्रेश म्हणजे मेटेंनन्स टूल, सिस्टम क्लिनर किंवा बुस्टर नाही. फक्त GUI अपडेट करणारं फीचर आहे.

3/7
विंडोज सतत फाइल्स, प्रोग्राम्स आणि प्रक्रियेवर लक्ष ठेवत असतो. मात्र कधी कधी स्क्रीनवर झालेले काही बदल लगेच दिसत नाहीत. जसं की नवी फाइल तयार केली, फाइल डिलीट केली, रिनेम केलं, आयकॉन जागा बदलली, यूएसबी जोडली पण आयकॉन दिसला नाही. अशा वेळी रिफ्रेश स्क्रीनला पुन्हा अपडेट करायला सांगतो. याला रिड्रॉ, रिरेंड्रिंग म्हणतात. रिफ्रेश केल्यावर विंडोज बदल ओळखतो आणि आयकॉन किंवा फोल्डर्सला पुन्हा रेंडर करून योग्य माहिती स्क्रीनवर दाखवतो.

4/7
विंडोज ऑपरेटिंग सिस्टिममध्ये रिफ्रेश हा पर्याय डेस्कटॉप किंवा फाइल एक्सप्लोरला स्वतःला पुन्हा अपडेट करायला सांगतो. सोप्या भाषेत रिफ्रेश म्हणजे स्क्रीनवरील माहिती, आयकॉन, फोल्डर्स किंवा फाइल यांची नवीन स्थिती पुन्हा दाखवणं.

5/7
विंडोज एक्सप्लोलर स्वतःला Sync करतो. एक्सप्लोररमध्ये उघडलेल्या फाइल लिस्ट्स किंवा फोल्डर्स अपडेट व्हायला वेळ लागू शकतो. रिफ्रेश केल्यावर एक्सप्लोरर पुन्हा त्या फोल्डरमधील फाइल्सची यादी वाचतो आणि ताजी माहिती दाखवतो.

6/7
कधी कधी डेस्कटॉप किंवा एक्सप्लोरर अडकून राहिल्यासारखी स्थिती होते. स्क्रिन फ्रिज होते. पण रिफ्रेश केल्यावर सिस्टम त्याचा GUI म्हणजे ग्राफिकल युझर इंटरफेस थोडा रिफ्रेश करते, ज्याने छोट्या-मोठ्या गडबडी दूर होतात आणि स्क्रीन अनफ्रिज होते.

7/7
नवी फाइल दिसत नाही, फाइल डिलीट केली दिसत नाही, यूएसबी डिव्हाइस इन्सर्ट केला पण आयकॉन दिसत नाही, डेस्कटॉप आयकॉन्स चुकीच्या ठिकाणी दिसत आहेत, स्क्रिन थोडी फ्रिज झाली आहे, एक्सप्लोरर नीट अप-टू-डेट दिसत नाही. यावेळी रिफ्रेश उपयोगी पडतो. रिफ्रेश करून विंडोजला नीट अपडेट कर असा आदेश मिळतो. सोप्या भाषेत रिफ्रेश म्हणजे स्क्लिनला अरे नीट दाखल, अपडेट हो असं सांगणं.

Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement