7 जन्माची साथ, 7 वर्षांचा दुरावा, अशोक खरातचा विवाहितेवर 4 वेळा अत्याचार, नवा धक्कादायक कांड
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Ashok Kharat Latest News: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातला अटक करून आता १० दिवस उलटले आहेत. त्याच्या अटकेनंतर त्याच्या काळ्या कृत्यांची अनेक प्रकरण समोर येत आहेत.
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातला अटक करून आता १० दिवस उलटले आहेत. त्याच्या अटकेनंतर त्याच्या काळ्या कृत्यांची अनेक प्रकरण समोर येत आहेत. त्याने शोषण केलेल्या महिला, त्याने लुटलेले लोक आता समोर येत अशोक खरात विरोधात फिर्याद दाखल करत आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा पुन्हा अशोक खरात विरोधात दोन नवे गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये एका विवाहित महिलेच्या लैंगिक शोषणाचा आणि एका व्यावसायिकाच्या आर्थिक फसवणुकीचा समावेश आहे. या नवीन गुन्ह्यांमुळे अशोक खरातवर आतापर्यंत दाखल झालेल्या एकूण गुन्ह्यांची संख्या १० वर पोहोचली आहे.
अशोक खरातने ४ वेळा अत्याचार केला
पीडित विवाहितेनं दिलेल्या तक्रारीनुसार, तिचं २०१३ मध्ये लग्न झालं होतं. २०१४ मध्ये त्यांना मुलगी झाली. मात्र नंतरच्या काळात त्यांचा पतीसोबत वाद होऊ लागला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर ती पतीपासून विभक्त राहू लागली. पण कालांतराने पीडितेच्या नातेवाईकांनी मध्यस्थी करत दोघांना अशोक खरातकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार दोघंही अशोक खरातकडे गेले. यावेळी खरातने दोघांचं म्हणणं ऐकून त्यांची समजूत घातली. सोबत राहण्याचा सल्ला दिला. खरातच्या सल्ल्यानुसार सात वर्षे दुरावा असलेलं हे जोडपं २०२२ पासून पुन्हा सोबत राहू लागलं.
advertisement
२०२२ डिसेंबर २०२४ या काळात पीडित तरुणी आणि तिचे पती सहा ते सात वेळा आरोपी खरातकडे सल्ला घेण्यासाठी गेले होते. दरम्यान, ऑगस्ट २०२४ मध्ये पीडित तरुणी पतीसह खरातला भेटण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये गेली असता, आरोपीनं पीडितेच्या पतीला केबिनमधून बाहेर जायला लावलं आणि पीडितेला एका भांड्यातील पाणी प्यायला दिलं. यानंतर खरातने तिच्या डोक्यावर तांब्या ठेवून गायत्री मंत्र म्हणायला लावला. यानंतर पीडितेचं डोकं जड होऊ लागलं. तिला गुंगी येताच आरोपीनं तिच्याशी जवळीक साधली. डोक्यावर हात फिरवत, चुंबन घेतले, तसेच मिठी मारायला सुरुवात केली.
advertisement
मी महादेवाचा अवतार आहे. माझ्याकडे दैवी शक्ती आहे. मला विरोध केला तर तुझा पती मरेल. तुझं आयुष्य बरबाद करेल, अशी धमकी देत आरोपी खरातने पीडितेचं लैंगिक शोषण केलं. ऑगस्ट २०२४ ते डिसेंबर २०२३ या पाच महिन्यांच्या काळात खरातने आपल्यावर चार वेळा अत्याचार केल्याचा आरोप पीडितेनं तक्रारीत केला आहे. पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा हा गुन्हा दाखल केला. पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Mar 28, 2026 2:16 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
7 जन्माची साथ, 7 वर्षांचा दुरावा, अशोक खरातचा विवाहितेवर 4 वेळा अत्याचार, नवा धक्कादायक कांड









