एका रूपयासाठी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना लोखंडी गजाने मारलं, लोणावळ्यात पर्यटकांकडून मोठा राडा
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पेट्रोल पंप कर्मचारी नरेश बाळू गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दुपारी साडेतीनच्या सुमारास काही ग्राहकांशी पेट्रोल भरल्यानंतर उरलेल्या अवघ्या एका रुपयावरून वाद झाला.
लोणावळा: थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यातून एक अजब प्रकार समोर आला आहे. पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी एका रुपयाच्या वादातून चक्क पेट्रोल पंपावर तांडव घातल्याची घटना घडली आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील 'देवेंद्र ऑटोलाईन' पेट्रोल पंपावर गुरुवारी दुपारी हा प्रकार घडला. या राड्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पेट्रोल पंप कर्मचारी नरेश बाळू गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दुपारी साडेतीनच्या सुमारास काही ग्राहकांशी पेट्रोल भरल्यानंतर उरलेल्या अवघ्या एका रुपयावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, संबंधित पर्यटकांनी जमाव गोळा केला आणि कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. संतापलेल्या पर्यटकांनी लोखंडी गजाचा वापर करून कर्मचारी नरेश गायकवाड आणि उमेश मिश्रा यांना गंभीर जखमी केले. इतकंच नाही तर पंपाच्या कार्यालयाच्या काचा फोडून मालमत्तेचे मोठे नुकसान केले.
advertisement
रायगडच्या ७ पर्यटकांवर गुन्हा दाखल
याप्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी पेण-कोळीवाडा (जि. रायगड) येथील अनंत विठ्ठल कोळी, प्रसाद संभाजी कोळी यांच्यासह सात जणांवर आणि इतर पाच अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये महिलांचाही समावेश असल्याचे समजते.
advertisement
पोलिस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. पर्यटकांच्या अशा हिंसक वर्तनामुळे स्थानिक व्यावसायिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, पर्यटकांनी संयम राखण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 28, 2026 2:05 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
एका रूपयासाठी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना लोखंडी गजाने मारलं, लोणावळ्यात पर्यटकांकडून मोठा राडा








