पुण्यात कांड करून तो वाराणसीत पोहोचला; पण ते 50 गुन्हे पाहून पोलीसही हादरले अन्.. अटकेचा सिनेस्टाईल थरार
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
एका कुख्यात बांगलादेशी आरोपीला पुणे पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्यावर आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये ३६ गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पुणे: विविध राज्यांत 50 हून अधिक घरफोड्या करून पोलिसांना चकवा देणाऱ्या एका कुख्यात बांगलादेशी आरोपीला पुणे पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. महम्मद बशर नूर मोहम्मद (वय ३८, रा. ढाका, बांगलादेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये ३६ गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
असं फुटलं बिंग
पुण्यातील कर्वेनगर परिसरातील 'द टेरीटरी' या कार्यालयात १५ मार्च रोजी चोरी झाली होती. यात खिडकीचे गज तोडून एका चोरट्याने ६ लाख ७१ हजार रुपयांचे कॅमेरे, महागड्या लेन्स आणि ड्रोन चोरून नेले होते. या घरफोडीनंतर अलंकार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांना समजले की, आरोपी दुचाकीवरून पुण्याबाहेर पळाला आहे.
advertisement
हैदराबाद ते वाराणसी...
हा चोरटा अत्यंत सराईत असल्याने तो सतत आपली ठिकाणे बदलत होता. तांत्रिक तपासात तो हैदराबाद, चंद्रपूर, नागपूर, जबलपूर मार्गे थेट वाराणसीपर्यंत पोहोचल्याचे उघड झाले. अलंकार पोलिसांनी तातडीने वाराणसी पोलिसांशी संपर्क साधून तिथे सापळा रचला. अखेर महम्मद बशरला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ६ लाखांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा आरोपी बनावट ओळखपत्रांच्या आधारे वास्तव्य करून गुन्हे करत होता.
advertisement
अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसोडे आणि उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांच्या पथकाने ही धाडसी कारवाई केली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 28, 2026 1:06 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात कांड करून तो वाराणसीत पोहोचला; पण ते 50 गुन्हे पाहून पोलीसही हादरले अन्.. अटकेचा सिनेस्टाईल थरार









