advertisement

संध्याकाळी भेटू, बर्थ डे पार्टीचं प्रॉमिस, थोड्याच वेळात आली वाईट बातमी, आता कधीच होणार नाही सेलीब्रेशन, ऋषिकेशनची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी

Last Updated:

खडीने भरलेल्या डंपरने जोरदार धडक दिली. या धडकेत कारच्या इंजिनला आग लागली. गाडीचे दरवाजे अचानक लॉक झाले त्यामुळे गाडीतून बाहेर पडणं देखील शक्य झालं नाही.

कारचा दरवाजा लॉक झाला आणि घात
कारचा दरवाजा लॉक झाला आणि घात
संध्याकाळी नक्की भेटू म्हणत त्याने मित्रांना बर्थ डे पार्टीचं प्रॉमिस दिलं आणि तो आईसोबत गावी निघाला. पण कुणाला माहिती नियतीच्या मनात काही वेगळच होतं. आईसोबत नातेवाईकांकडे गावी निघालेलं असताना अचानक समोरून डंपर आला आणि त्याने एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. खडीने भरलेल्या डंपरने जोरदार धडक दिली. या धडकेत कारच्या इंजिनला आग लागली. गाडीचे दरवाजे अचानक लॉक झाले त्यामुळे गाडीतून बाहेर पडणं देखील शक्य झालं नाही.
टिप्परच्या चुकीमुळे घात
खडीने भरलेल्या भरधाव टिप्परने कारला समोरासमोर जोरदार धडक दिली. या भीषण धडकेमुळे कारने अचानक पेट घेतला या भीषण अपघातात आई व मुलाचा होरपळून जागीच मृत्यू झाल्याची घटना बीड-अहिल्यानगर राज्य महामार्गावर शुक्रवारी 11च्या सुमारास घडली. केज तालुक्यातील मूळ रहिवासी असलेले व गेल्या काही दिवसापासून आष्टी येथे स्थायिक झालेले ऋषिकेश पुरी व त्यांची आई पुष्पा पुरी हे आपल्या कारमधून बीडच्या दिशेने जात होते.
advertisement
काय घडलं?
याच वेळी बीडकडून डोईठाणकडे खडी घेऊन जाणाऱ्या एका भरधाव हायवाने कापशी गावाजवळ कारला समोरून जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, कारच्या इंजिनने तात्काळ पेट घेतला. कारने पेट घेतल्याने आत असलेल्या आई व मुलाला दरवाजा उघडून बाहेर पडता आले नाही. आगीने रौद्र रूप धारण केले मदतीसाठी लोक धावण्यापूर्वीच दोन्ही प्रवाशांचा कारमध्येच होरपळून मृत्यू झाला. या घटनेमुळे महामार्गावर मोठी गर्दी झाली होती तर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
advertisement
मित्रांसोबत शेवटचं बोलणं काय झालं?
मी आईसोबत नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी गावी जात आहे. संध्याकाळी भेटू, बर्थ डे पार्टीसाठी देखील मित्रांना प्रॉमिस करून ऋषिकेश पुरी निघाला होता. मित्रांसोबत झालेला तो शेवटचा संवाद होता. त्यानंतर ऋषिकेश अशा अवस्थेत पोहोचला की मित्रांनाही मोठा धक्का बसला. आता त्याचा बर्थडे कधीच सेलिब्रेट करता येणार नव्हता. त्याच्या मृत्यूच्या बातमीनं मित्रांना मोठा धक्का बसला. 28 मार्च रोजी ऋषिकेशचा बर्थ डे होता.
advertisement
26 वर्षीय ऋषिकेशला मोठा भाऊ आहे जो CA आहे. तो देखील पुण्यात CA कडे इंटर्नशिप करत होता. एका कार्यक्रमानिमित्ताने आईसोबत नातेवाईकांकडे जात असताना ही दुर्घटना घडली. प्रत्यक्षदर्शिंच्या म्हणण्यानुसार आगीचा भडका खूप मोठा होता. स्थानिकांनी पाणी ओतून आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र संपूर्ण आग अटोक्यात येईपर्यंत खूप उशीर झाला होता. शिवाय कारला आग लागल्यानंतर दरवाजे लॉक झाल्यामुळे आई आणि मुलाला वाचवता आलं नाही.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
संध्याकाळी भेटू, बर्थ डे पार्टीचं प्रॉमिस, थोड्याच वेळात आली वाईट बातमी, आता कधीच होणार नाही सेलीब्रेशन, ऋषिकेशनची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement