गोराईत PGमध्ये राहणारी तरुणी आढळली मृत, मुंबईतील खळबळजनक घटना!
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
मुंबईच्या उपनगरातील बोरीवली पश्चिम भामुंबईच्या उपनगरातील बोरीवली पश्चिम भागात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोराई क्रमांक २ परिसरातील 'नारायण पीजी गेस्ट हाऊस' मध्ये एक तरुणी मृतावस्थेत आढळली आहे.
विजय वंजारा, प्रतिनिधी मुंबई: मुंबईच्या उपनगरातील बोरीवली पश्चिम भागात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोराई क्रमांक २ परिसरातील 'नारायण पीजी गेस्ट हाऊस' मध्ये एक तरुणी मृतावस्थेत आढळली आहे. तिने रुममधील पंख्याला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
जिया अशोक गदर असं मृत आढळलेल्या ३५ वर्षीय तरुणीचं नाव आहे. जिया ही गोराई येथील नारायण पीजी गेस्ट हाऊसमध्ये राहत होती. ती मुळची गुजरातची रहिवासी असून वांद्रे येथील एका सलूनमध्ये ती काम करत होती. शनिवारी दुपारी तिने राहत्या रुममध्ये आयुष्याचा शेवट केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी तातडीने पोलिसांना पाचारण केलं. घटनेची माहिती मिळताच बोरीवली पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झालं.
advertisement
पोलिसांकडून पंचनामा आणि तपास
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना आत्महत्येची असल्याचं दिसून येत आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा रितसर पंचनामा केला असून, मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला आहे. पोलीस सध्या गेस्ट हाऊसमधील कर्मचारी, जियाचे मित्र आणि नातेवाईक यांची चौकशी करत आहेत.
जियाने हे टोकाचं पाऊल का उचललं? ती कोणत्या मानसिक तणावाखाली होती का? किंवा तिचे कोणाशी काही वाद होते का? या सर्व अंगांनी बोरीवली पोलीस तपास करत आहेत. भरवस्तीत असलेल्या पीजी गेस्ट हाऊसमध्ये ही घटना घडल्याने परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होते. एका तरुण मुलीने अशा प्रकारे आपले आयुष्य संपवल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 28, 2026 1:44 PM IST










