Asia Cup ची ट्रॉफी घेऊन पळालेल्या पाकिस्तानच्या नक्वीला धडा शिकवणार, BCCI ने दिला कडक इशारा! पाहा Video
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Devajit Saikia warn ACC chairman : आम्हाला आशा आहे की, ट्रॉफी आणि मेडल्स लवकरात लवकर भारताला परत केली जातील, असं म्हणत बीसीसीआयचे सेक्रेटरी देवजित साईकिया यांनी मोहसिन नक्वी यांना इशारा दिला आहे.
BCCI Secretary On Asia cup trophy : आशिया कपमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव केला, पण त्यानंतर मोठा राडा झाल्याचं पहायला मिळालं. टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्विकारण्यास नकार दिला. त्यानंतर नक्वी ट्रॉफी आणि मेडल उचलून घेऊन गेले. अशातच आता आशिया कप 2025 च्या फायनलमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानला हरवल्यानंतर झालेल्या गोंधळावर बीसीसीआयचे सेक्रेटरी देवजित साईकिया यांनी एसीसी अध्यक्ष आणि पीसीबी (PCB) प्रमुख मोहसिन नक्वी यांच्यावर तीव्र टीका केली आहे.
ट्रॉफी आणि मेडल्स घेऊन जाणं खूप दुर्भाग्यपूर्ण - बीसीसीआय सेक्रेटरी
आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष हे पाकिस्तानच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असल्यामुळे आम्ही त्यांच्या हातून आशिया कपची ट्रॉफी न घेण्याचा निर्णय घेतला. परंतु, याचा अर्थ असा होत नाही की त्या व्यक्तीने ट्रॉफी आणि मेडल्स घेऊन जावं. हे खूप दुर्भाग्यपूर्ण आहे, असं म्हणत बीसीसीआयचे सेक्रेटरी देवजित साईकिया यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
advertisement
Trophy Chor Mohsin Naqvi #indvspak2025 #INDvsPAK #mohsinnaqvi pic.twitter.com/uYlpJ7ScFX
— Ankan Kar (@AnkanKar) September 29, 2025
#WATCH : Indian players refuse to share stage with PCB Chairman Mohsin Naqvi at Asia Cup presentation ceremony#AsiaCup #AsiaCupT20 #AsiaCupFinal #TeamIndia #bumrah #bumrahCelebration #HarisRauf #INDvPAK #indvspak2025 #INDvsPAK #IndiaVsPakistan #tilakvarma #tilakverma #TILAK pic.twitter.com/1eK64QWwIJ
— ViralVolt (@ViralVolT1) September 28, 2025
advertisement
आयसीसीकडे मुद्दा उचलणार - देवजित साईकिया
आम्हाला आशा आहे की, ट्रॉफी आणि मेडल्स लवकरात लवकर भारताला परत केली जातील. नोव्हेंबरमध्ये दुबईमध्ये आयसीसीची कॉन्फरन्स आहे. पुढील कॉन्फरन्समध्ये आम्ही एसीसी अध्यक्षांच्या या कृतीविरुद्ध अतिशय गंभीर आणि जोरदार निषेध नोंदवणार आहोत, असं म्हणत बीसीसीआयचे सेक्रेटरी देवजित साईकिया यांनी पाकिस्तानला वॉर्निंग दिली आहे.
advertisement
रिंकूचा विजय चौकार
पाकिस्तानने प्रथम बॅटिंग करताना मजबूत सुरुवात केली, परंतु कुलदीप यादव (4/30) आणि इतर स्पिनर्सच्या भेदक बॉलिंगमुळे त्यांचा डाव 146 रन्सवर गडगडला. प्रत्युत्तरात, भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली आणि 20/3 अशी त्यांची स्थिती झाली. मात्र, युवा फलंदाज तिलक वर्मा याने एक संयमी आणि मॅच-विनिंग इनिंग खेळत, नाबाद 69 रन्स (3 फोर आणि 4 सिक्स) केले. त्याला शिवम दुबे (33 रन्स) आणि शेवटी रिंकू सिंग याने विनिंग फोर मारून चांगली साथ दिली. या रोमहर्षक मॅचमध्ये भारताने 5 विकेट्स राखून विजय मिळवत, विक्रमी नवव्यांदा आशिया कपचे टायटल जिंकले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 29, 2025 8:21 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asia Cup ची ट्रॉफी घेऊन पळालेल्या पाकिस्तानच्या नक्वीला धडा शिकवणार, BCCI ने दिला कडक इशारा! पाहा Video