advertisement

'शाळेतली पोरं...', आफ्रिदी-रिझवानवर वॉर्नर प्रचंड संतापला, PSL च्या पत्रकार परिषेदत ड्रामा, Video

Last Updated:

पाकिस्तान सुपर लीग 2026 ला गुरूवारपासून सुरूवात होत आहे, पण पीएसएलच्या या सिझनच्या पहिल्या सामन्याआधीच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मोठा ड्रामा झाला.

'शाळेतली पोरं...', आफ्रिदी-रिझवानवर वॉर्नर प्रचंड संतापला, PSL च्या पत्रकार परिषेदत ड्रामा, Video
'शाळेतली पोरं...', आफ्रिदी-रिझवानवर वॉर्नर प्रचंड संतापला, PSL च्या पत्रकार परिषेदत ड्रामा, Video
मुंबई : पाकिस्तान सुपर लीग 2026 ला गुरूवारपासून सुरूवात होत आहे, पण पीएसएलच्या या सिझनच्या पहिल्या सामन्याआधीच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मोठा ड्रामा झाला. कराची किंग्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने पत्रकार परिषदेत बोलत असताना त्याच्या शेजारी असलेल्या खेळाडूंना जाहीरपणे फटकारले. पीएसएल सुरू व्हायच्या आधी लाहोरच्या गडाफी स्टेडियममध्ये सर्व कर्णधारांची पत्रकार परिषद पार पडली तेव्हा ही घटना घडली.
डेव्हिड वॉर्नर पत्रकार परिषदेमध्ये मीडियासोबत बोलत असताना त्याच्या शेजारी बसलेले शाहीन आफ्रिदी, मोहम्मद रिझवान आणि सौद शकील आपापसात बोलत आणि हसत होते. या तिघांना बोलताना पाहून वॉर्नरला प्रचंड राग आला आणि त्यांच्या वर्तणुकीवर वॉर्नरने भर पत्रकार परिषदेमध्ये निशाणा साधला.
'तुम्हाला काय झालंय? माफ करा, इथे काही शाळकरी मुलं बसली आहेत', असं डेव्हिड वॉर्नर आफ्रिदी, रिझवान आणि शकील यांच्याकडे पाहून म्हणाला. डेव्हिड वॉर्नरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement

पत्रकार परिषदेत नेमकं काय झालं?

डेव्हिड वॉर्नर हा एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत होता, तेव्हा शाहीन आफ्रिदी सौद शकील, मोहम्मद रिझवान आणि मार्नस लाबुशेन एकमेकांसोबत बोलत होते, त्यामुळे वॉर्नरला राग आला.
advertisement
डेव्हिड वॉर्नर याने मागच्या वर्षी पीएसएलमध्ये पदार्पण केलं. पीएसएल 2025 मध्ये वॉर्नरने 11 सामन्यांमध्ये 368 रन केल्या. वॉर्नरच्या नेतृत्वात कराची किंग्स टीम लीगमध्ये तिसऱ्या क्रमांकावर राहिली, पण एलिमिनेटरमध्ये त्यांचा लाहोरकडून 6 विकेटने पराभव झाला. आता नव्या मोसमात पीएसएल ट्रॉफी जिंकण्यासाठी वॉर्नरची टीम मैदानात उतरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'शाळेतली पोरं...', आफ्रिदी-रिझवानवर वॉर्नर प्रचंड संतापला, PSL च्या पत्रकार परिषेदत ड्रामा, Video
Next Article
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement